अतुल सुभाष प्रकरणाची राजधानी दिल्लीत पुनरावृत्ती! व्हिडिओ पोस्ट करत बिझनेसमनने केली आत्महत्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अतुल सुभाष प्रकरणाची राजधानी दिल्लीत पुनरावृत्ती! व्हिडिओ पोस्ट करत बिझनेसमनने केली आत्महत्या

अतुल सुभाष प्रकरणाची राजधानी दिल्लीत पुनरावृत्ती! व्हिडिओ पोस्ट करत बिझनेसमनने केली आत्महत्या

Jan 01, 2025 02:49 PM IST

Puneet Khurana Suicide Case: बेंगळुरूपाठोपाठ दिल्लीतही अतुल सुभाष याच्या आत्महत्येसारखे प्रकरण समोर आले आहे. राजधानीतील मॉडेल टाऊनमध्ये एका तरुणाने पत्नीच्या त्रासाला कंटाळून ५४ मिनिटांचा व्हिडिओ बनवून आपलं जीवन संपवलं आहे. पुनीत खुराना असे तरुणाचं नाव आहे.

अतुल सुभाष प्रकरणाची राजधानी दिल्लीत पुनरावृत्ती! व्हिडिओ पोस्ट करत बिझनेसमनने केली आत्महत्या
अतुल सुभाष प्रकरणाची राजधानी दिल्लीत पुनरावृत्ती! व्हिडिओ पोस्ट करत बिझनेसमनने केली आत्महत्या

Puneet Khurana Suicide Case: बेंगळुरूपाठोपाठ दिल्लीतही अतुल सुभाष यांच्या आत्महत्ये सारखं एक प्रकरण समोर आले आहे. राजधानी दिल्लीतील मॉडेल टाऊनमधील कल्याण विहारमध्ये एका तरुणाने आपल्या राहत्या घरी ५४ मिनिटांचा व्हिडिओ बनवून गळफास घेत जीवन संपवलं आहे. पुनीत खुराना असं आत्मतहत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. त्यांची पत्नी मनिका पाहवा ही त्याला त्रास देत असल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचललं आहे असा आरोप त्यांच्या घरच्यांनी केला आहे. दोघांमध्ये सध्या घटस्फोटाचे प्रकरण सुरू होतं. पुनीत खुराना हा रेस्टॉरंट व्यावसायिक आहे.

पुनीत होता रेस्टॉरंट व्यावसायिक

पुनीत हा दिल्लीतील प्रसिद्ध बेकरी व रेस्टॉरंट व्यावसायिक होता. त्याचे त्याच्या पत्नीशी वाद सुरू होते. दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्याची पत्नी त्याला त्रास देत असल्याने त्याने दिल्लीच्या कल्याण विहार परिसरातील मॉडेल टाऊन येथील एका घरात गळफास घेऊन स्वतःचे आयुष्य संपवले. पुनीत व त्याची पत्नी हे बेकरी व्यवसायात भागीदार होते. पोलिसांनी तरुणाचा फोन ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांना घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, ३९ वर्षीय पुनीत खुराना यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. पत्नीच्या छळाला कंटाळून मुलाने हे पाऊल उचलल्याचे पुनीतच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

 

अतुल सुभाष प्रकरणाची राजधानी दिल्लीत पुनरावृत्ती! व्हिडिओ पोस्ट करत बिझनेसमनने केली आत्महत्या
अतुल सुभाष प्रकरणाची राजधानी दिल्लीत पुनरावृत्ती! व्हिडिओ पोस्ट करत बिझनेसमनने केली आत्महत्या

आठ वर्षांपूर्वी झाले होते लग्न

आठ वर्षांपूर्वी दोघांचे लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांत त्यांच्यात वाद होऊ लागले होते. दोन वर्षांपूर्वी पुनीतची पत्नी ही त्याला सोडून माहेरी निघून गेली होती. यानंतर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटाचा खटला दाखल केला. या दोघांमधील संभाषणाचा एक ऑडिओही व्हायरल होत आहे. पत्नीसोबत सुरू असलेल्या वादामुळे पुनीत हा तणावाखाली होता, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत्यूपूर्वी त्याने एक व्हिडिओ बनवला होता, असे सांगितले जात आहे. कुटुंबीयांचा आरोप लक्षात घेऊन पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा करताना पुनीतचा फोन जप्त केला आहे. त्यानुसार प्रकरणाचा तपास सुरू आहे. २०१६ मध्ये या तरुणाचा विवाह डेरावाला नगरमध्ये राहणाऱ्या मनिका हिच्याशी झाला होता. लग्न झाल्यानंतर पुनीत आणि त्यांच्या पत्नीने एक बेकरी सुरू केली होती. तसेच काही महिन्यांपूर्वी त्यांनी एका कॅफेचीही सुरुवात केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी पुनीत यांनी ३१ डिसेंबरच्या रात्री पत्नीशी फोनवरून शेवटचे संभाषण केले होते. बेकरी व्यवसायाबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर