Delhi Exit Poll : दिल्ली सत्तांतर... कमळ फुलणार, डबल इंजिन धावणार! पाहा सर्व एक्झिट पोलचे निकाल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Delhi Exit Poll : दिल्ली सत्तांतर... कमळ फुलणार, डबल इंजिन धावणार! पाहा सर्व एक्झिट पोलचे निकाल
Delhi Elections 2025 Live : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलची उत्सुकता
Delhi Elections 2025 Live : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलची उत्सुकता

Delhi Exit Poll : दिल्ली सत्तांतर... कमळ फुलणार, डबल इंजिन धावणार! पाहा सर्व एक्झिट पोलचे निकाल

Ganesh Pandurang Kadam 02:12 PM ISTFeb 05, 2025 07:42 PM
  • twitter
  • Share on Facebook

Delhi Assembly Elections : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आज एक्झिट पोलचे निकाल जाहीर होणार आहेत. या देशात अंदाजांबद्दल कमालीची उत्सुकता आहे.

Wed, 05 Feb 202502:12 PM IST

केवळ एका सर्वेमध्ये केजरीवालांना दिलासा, दिल्लीत बनणार AAP सरकार

Mind Brink च्या एक्झिट पोलमध्ये आम आदमी पार्टी चौथ्यांदा सरकार स्थापन करण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या एक्झिट पोलनुसार अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला ४४ ते ४९ जागा मिळण्याचा अंदाज आहे तर भाजप गेल्यावेळच्या तुलनेत अधिक जागा जिंकून विरोधी पक्षात राहील. 

Wed, 05 Feb 202501:58 PM IST

Delhi Exit Poll 2025 Live : सर्व एक्झिट पोलमध्ये अरविंद केजरीवालांना धक्का, भाजपला सत्ता

Poll Diary के एक्झिट पोलनुसार 

भाजप -४२ ते ५०

आम आदमी पार्टी – १८ ते २५ 

काँग्रेस – ० ते २

JVC  एक्झिट पोल 

भाजप -३९ ते ४५ 

आप – २२ ते ३१ 

पी-मार्क एक्झिट पोल 

भाजप ३९ ते ४९ 

आप २१ ते ३१ 

पीपल्स इनसाइट पोल

भाजप -४४ 

आप – २९ 

WeePreside Exit Poll : वी प्रीसाईड एक्झिट पोल

भाजप - ४६-५२

AAP - १८-२३

कांग्रेस - ०-१

Wed, 05 Feb 202501:35 PM IST

Delhi Exit Poll 2025 Live :  चाणक्य पोलनुसार भाजप ४४ जागांसह सत्तेत येणार

चाणक्य स्ट्रॅटजी एग्जिट पोलमध्येही भाजपला बहुमत दिले आहे. या सर्वेनुसार, दिल्लीत आपला २५ ते २८ जागा तर भाजपला ३९ ते ४४ जागा मिळताना दिसत आहे. काँग्रेसच्या खात्यातही २ ते ३ जागा जाताना दिसत आहेत.

Wed, 05 Feb 202501:33 PM IST

Delhi Exit Poll 2025 Live : MATRIZE सर्वेनुसार दिल्लीत भाजप व आम आदमी पार्टीत जोरदार टक्कर

दिल्लीच्या ७० विधानसभा जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर येऊ लागले आहेत. एक्झिट पोलमध्ये दिल्लीत सत्तांतर होताना दिसत आहे. MATRIZE सर्वेनुसार दिल्लीत भाजप व आम आदमी पार्टीत जोरदार टक्कर होत असून बीजेपीला काठावरचे बहुमत मिळताना दिसत आहे. या आकड्यांनुसार आपला ३२ ते ३७ जागा मिळत असून भाजपच्या खात्यात ३५ ते ४० जागा जात आहेत. दरम्यान काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. 

Wed, 05 Feb 202501:12 PM IST

पहिला एक्झिट पोल समोर; भाजप २७ वर्षानंतर सत्तेत परतणार

पहिला  एक्झिट पोल समोर; भाजप २७ वर्षानंतर सत्तेत परतणार

Delhi Exit Poll Live: पीपुल्स पल्स आणि कोडमो यांनी २७ वर्षानंतर भाजप ५१ ते ६० जागा जिंकून बहुमत मिळवत असल्याचे दाखवले आहे. तर आप २० हून कमी जागांवर राहू शकते

Wed, 05 Feb 202512:41 PM IST

सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५७.७८ टक्क्यांहून अधिक मतदान

Delhi Election 2025 Voting : निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार दिल्ली विधानसभा निवडणुकासाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५७.७८ टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. अजूनही अनेक मतदान केंद्राबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे.

Wed, 05 Feb 202510:21 AM IST

Delhi Exit Poll 2025 Live : एक्झिट पोल कोण घेतं, तुम्हालाही माहीत हवं!

अधिकृत निकाल जाहीर होण्याआधी जनमताचा कानोसा घेण्यासाठी एक्झिट पोल होतात. खासगी कंपन्या आणि मीडिया हाउसेस हे एक्झिट पोल घेतात. जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर ही पद्धत वापरली जाते. मात्र, एक्झिट पोलच्या अचूकतेवर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं.

Wed, 05 Feb 202510:19 AM IST

Delhi Exit Poll 2025 Live : एक्झिट पोल म्हणजे नक्की काय?

एक्झिट पोल म्हणजे मतदान करून मतदार मतदान केंद्राबाहेर पडत असताना त्याला विचारून बांधलेला अंदाज असतो. निवडणुकीपूर्वी घेतलेल्या ओपिनियन पोलच्या तुलनेत हे एक्झिट पोल अधिक योग्य असतात असं म्हटलं जातं. मतदान केल्यानंतर लोक प्रामाणिक उत्तरे देण्याची शक्यता जास्त असते, असं यामागचं गृहितक आहे.

Wed, 05 Feb 202510:16 AM IST

Delhi Exit Poll 2025 Live : दिल्लीत किती मतदार आहेत? पाहूया अधिकृत आकडेवारी

केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, दिल्लीमध्ये १,५५,३७,६३४ पात्र मतदार आहेत. विधानसभेच्या ७० जागांसाठी यावेळी ६९९ उमेदवार मैदानात आहेत. आम आदमी पार्टी (AAP), भारतीय जनता पक्ष (BJP) आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत आहे. जो पक्ष सर्वाधिक जागा जिंकेल तोच पुढचं सरकार दिल्लीत बनवेल. निवडणूक आयोग शनिवारी, ८ फेब्रुवारी रोजी अंतिम निकाल जाहीर करणार आहे.

Wed, 05 Feb 202510:14 AM IST

Delhi Exit Poll 2025 Live : एक्झिट पोलबद्दल भारतीय निवडणूक आयोग काय म्हणतो?

भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एका टप्प्यातील निवडणुकीत, मतदान संपेपर्यंतच्या ४८ तासांच्या कालावधीत कोणत्याही वेळी घेतलेल्या मतांचे किंवा एक्झिट पोलचे निकाल प्रकाशित, प्रसिद्ध किंवा प्रसारित केले जाऊ शकत नाहीत.

Wed, 05 Feb 202510:12 AM IST

Delhi Exit Poll 2025 Live : दिल्ली निवडणुकीचे एक्झिट पोल कधी लाइव्ह होतील?

दिल्लीतील एक्झिट पोलचे निकाल सायंकाळी साडेसहा वाजेनंतर  जाहीर होतील. कारण, दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सर्व ७० जागांसाठी मतदान संध्याकाळी ६ वाजता संपणार आहे. एचटी मराठीवर तुम्हाला एक्झिट पोलची सर्व माहिती मिळेल.

Wed, 05 Feb 202510:07 AM IST

Delhi Exit Poll 2025 Live : २०१५ मधील एक्झिट पोलच्या निकालांवर एक नजर

२०१५ मध्ये कोणत्याही एक्झिट पोलनं आम आदमी पक्ष ६० जागांचा आकडा पार करेल, असा अंदाज वर्तवला नव्हता. त्यातल्या त्यात Axis My India नं वर्तवलेला ५३ जागांचा अंदाज प्रत्यक्ष निकालाच्या जवळ जाणारा होता. सर्वात कमी ३९ जागांचा अंदाज India TV-CVoter नं वर्तवला होता.

Wed, 05 Feb 202510:04 AM IST

Delhi Exit Poll 2025 Live : २०२० मध्ये काय होते एक्झिट पोलचे अंदाज?

२०२० मध्ये एकूण आठ एक्झिट पोल चाचण्यांनी आम आदमी पक्षाला ५४ जागांसह विजय मिळेल असा अंदाज वर्तवला होता. भाजपला १५ आणि काँग्रेसला ० जागा मिळतील असं दाखवलं होतं. मात्र, आम आदमी पक्षाला ६२ व भाजपला ८ जागा मिळाल्या होत्या.

Wed, 05 Feb 202509:59 AM IST

Delhi Elections Exit Poll 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल विषयी उत्सुकता

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलचे निकाल आज मतदान संपल्यानंतर घोषित केले जातील. आम आदमी पक्ष दिल्लीच्या राजकारणात आल्यापासून प्रत्येक वेळी त्यांच्याबद्दलचे मतचाचण्यांचे व एक्झिट पोलचे आडाखे चुकले आहेत. एक्झिट पोलनं २०१३ मध्ये त्रिशंकू विधानसभेचा अचूक अंदाज वर्तवला होता. २०१५ आणि २०२० मध्ये आपच्या डोंगराएवढ्या विजयाचा अंदाज कोणालाही वर्तवता आला नव्हता. यावेळी काय होते याविषयी उत्सुकता आहे.

Wed, 05 Feb 202510:11 AM IST

Delhi Elections Exit Poll 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू; दिग्गजांनी केलं मतदान

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असून दुपारी तीन वाजेपर्यंत ५० टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याची माहिती आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी सहकुटुंब मतदान केलं.