Delhi assembly Election Result : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने जबरदस्त कामगिरी करत २७ वर्षापासूनचा सत्तेचा दुष्काळ संपवला आहे. भाजप बहुमताने सरकार स्थापन करताना दिसत आहे. पक्षाला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळताना दिसत आहेत. दरम्यान, दोन राष्ट्रीय पक्ष असे आहेत ज्यांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार नोटाला ०.५७ टक्के मते मिळाली तर बहुजन समाज पक्षाला ०.५५ टक्के आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला अवघी ०.०१ टक्के मते मिळाली.
बसप आणि सीपीएम हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष आहेत. आकडेवारीनुसार, भाकप आणि जेडीयूला अनुक्रमे ०.०१ आणि ०.५३ टक्के मते मिळाली. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी ६०.५४ टक्के मतदान झाले होते. ज्यात ९४,५१,९९७ लोकांनी मतदान केले. १.५५ कोटींहून अधिक लोक मतदार यादीत आहेत. २०१३ मध्ये सुरू करण्यात आलेले नोटा हे चिन्ह इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनला (ईव्हीएम) पर्याय आहे . ज्यामध्ये मसीनवर काळ्या रंगाचे दोन क्रॉस बनवले आहेत.
सप्टेंबर २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने मतदान पॅनेलवर शेवटचा पर्याय म्हणून ईव्हीएमवरील 'नोटा'चे बटण जोडले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशापूर्वी ज्यांना कोणत्याही उमेदवाराला मतदान करायचे नव्हते, त्यांना फॉर्म ४९-ओ भरण्याचा पर्याय होता. परंतु निवडणूक आचारसंहिता १९६१ च्या नियम ४९-ओ अन्वये मतदान केंद्रावर अर्ज भरल्याने मतदाराच्या गोपनीयतेशी तडजोड झाली. मात्र, मतदान करताना बहुसंख्य मतदारांनी 'नोटा'चा पर्याय वापरल्यास नव्याने निवडणूक घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागला असून २७ वर्षानंतर भाजपने दिल्लीची सत्ता मिळवली आहे. भाजपने ४८ जागांवर आघाडी घेतल्याने भाजप बहुमतासह सरकार स्थापन करणार हे चित्र जवळपास निश्चित झाले आहे. त्यातच आता भाजपकडून कोणाला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली जाते? याची चर्चा सुरू झाली आहे. खासदार व भोजपुरी अभिनेते मनोज तिवारी यांना दिल्लीच्या राजकारणात आणले जाईल, अशी एक चर्चा सुरु असतानाच केजरीवाल यांचा पराभव करणारे जायंट किलर प्रवेश वर्मा यांच्याही नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपा दिल्ली प्रभारी बैजयंत पांडा यांनी सांगितले की दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल यावर लवकरच निर्णय घेतला जाईल.
संबंधित बातम्या