महिलांना २५०० रुपये..! दिल्लीकरांवर आश्वासनांचा पाऊस, पाहा कोणता पक्ष जिंकल्यावर काय-काय मिळणार? वाचा संपूर्ण माहिती
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  महिलांना २५०० रुपये..! दिल्लीकरांवर आश्वासनांचा पाऊस, पाहा कोणता पक्ष जिंकल्यावर काय-काय मिळणार? वाचा संपूर्ण माहिती

महिलांना २५०० रुपये..! दिल्लीकरांवर आश्वासनांचा पाऊस, पाहा कोणता पक्ष जिंकल्यावर काय-काय मिळणार? वाचा संपूर्ण माहिती

Jan 17, 2025 09:05 PM IST

Delhi Assembly election : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीत आश्वासनांचा पाऊस पडत आहे. सलग चौथ्यांदा सत्ता स्थापनेसाठी 'आप'ने पुन्हा एकदा मोफत योजनांचा आग्रह धरला आहे, तर यावेळी भाजप आणि काँग्रेसने आश्वासनांची खैरात केली आहे.

दिल्लीकरांवर आश्वासनांचा पाऊस
दिल्लीकरांवर आश्वासनांचा पाऊस

Delhi Assembly election 2025 : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीत आश्वासनांचा पाऊस पडत आहे. आम आदमी पक्षाने सलग चौथ्यांदा सत्ता स्थापनेसाठी पुन्हा एकदा मोफत योजनांचा आग्रह धरला असला तरी यावेळी भाजप आणि काँग्रेसनेही जोरदार टक्कर दिली आहे. तिन्ही पक्षांनी महिलांसाठी आर्थिक मदत आणि मोफत योजनांचे आश्वासन देऊन जनतेला आकर्षित करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. मात्र, आश्वासनांची फेरी अद्याप पूर्ण झालेली नाही. संकल्पपत्राचा हा पहिला भाग असल्याचे भाजपने म्हटले आहे.  'आप'ने अधिकृतपणे जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही, त्यामुळे काँग्रेसही एक-एक करून आश्वासने जाहीर करत आहे.

 

भाजपाची ५ मोठी आश्वासने -

  • 1. महिलांना प्रतिमहिना २५०० रुपये : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शुक्रवारी भाजपच्या जाहीरनाम्याचा पहिला भाग जाहीर केला आणि दिल्लीत भाजपची सत्ता येताच 'महिला समृद्धी योजना' राबविण्यात येईल, असे सांगितले. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत ही योजना मंजूर करण्यात येणार असून महिलांना दरमहा २५०० रुपये देण्यात येणार आहेत.
  • 2. स्वस्त आणि मोफत सिलिंडर : दिल्लीतील प्रत्येक गरीब कुटुंबाला ५०० रुपयांत सिलिंडर देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. याशिवाय होळी आणि दिवाळीला ही एक मोफत सिलिंडर देण्यात येणार आहे.
  • 3. आयुष्मान योजना, वृद्धांसाठीही मोठं आश्वासन : पहिल्या कॅबिनेट बैठकीतच दिल्लीत आयुष्मान योजना लागू करण्यात येईल, असं भाजपनं म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार ५ लाख रुपयांचे मोफत उपचार देते, दिल्ली सरकारकडून ५ लाख रुपयांचे अतिरिक्त कव्हर देखील दिले जाईल. याशिवाय सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत ओपीडी आणि तपासणीसह १० लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार देण्यात आले आहेत.
  • 4. पेन्शनमध्ये वाढ : ६० ते ७० वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांचे पेन्शन २००० रुपयांवरून २५०० रुपये करण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे.  ७० वर्षावरील वयोगटातील ज्येष्ठ नागरिक, विधवा, निराधार महिलांचे पेन्शन दरमहा २५०० रुपयांवरून ३००० रुपये करण्यात येणार आहे.
  • 5. झोपडपट्ट्यांजवळ 5 रुपयांत जेवण  : जेजे क्लस्टरमध्ये अटल कॅन्टीन सुरू करण्यात येणार असल्याचे भाजपने म्हटले आहे. पाच रुपयांत पोषण आहार दिला जाणार आहे.

Maharashtra politics : शरद पवारांना धक्का..! आमदारानं सोडली साथ, अजितदादांचं ‘घड्याळ’ बांधणार हातात

काँग्रेसने आतापर्यंत काय काय आश्वासने दिलीत?

  • 1.३०० यूनिटपर्यंत मोफत वीज -दिल्लीत आमचे सरकार स्थापन झाल्यास प्रत्येक कुटुंबाला एका महिन्यात ३०० युनिट मोफत वीज दिली जाईल, असे आश्वासन काँग्रेस पक्षाने दिले आहे. यापेक्षा जास्त वापर झाल्यास केवळ ३०० युनिटपेक्षा जास्त वापराचे बिल द्यावे लागणार आहे.
  • 2. स्वस्त सिलिंडर आणि मोफत रेशन - काँग्रेसने महागाई मुक्ती योजनेअंतर्गत आश्वासन दिले होते की, सरकार स्थापन झाल्यास दिल्लीतील रहिवाशांना ५०० रुपयांत  सिलिंडर आणि मोफत रेशन किट दिले जातील.
  • 3. महिलांना दरमहा २५०० : काँग्रेसने 'प्यारी दीदी योजना' राबविण्याची घोषणा केली आहे. सरकार स्थापन झाल्यास दिल्लीतील महिलांच्या खात्यात दरमहा अडीच हजार रुपये जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
  • 4.  २५ लाखांचा विमा : काँग्रेस पक्षाने 'जीवन रक्षा योजना' चालवण्याचे आश्वासन दिले आहे. यात २५ लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
  • 5. ८५०० रुपये बेरोजगारी भत्ता : दिल्लीतील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना एका वर्षासाठी दरमहा ८,५०० रुपये देण्याचे आश्वासनही काँग्रेस पक्षाने दिले होते.

मोदी सरकारनं युद्धनौकेला 'सुरत' नाव का दिलं? ठाकरेंच्या शिवसेनेनं बांधला असा अंदाज

AAP ने काय दिलेत आश्वासने ?

  • 1. मोफत योजना सुरूच राहतील : आम आदमी पार्टी आणि त्याचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत मोफत योजना सुरूच राहतील, असे वारंवार स्पष्ट केले आहे. दिल्ली सरकार महिलांसाठी 200 युनिट मोफत वीज, मोफत पाणी, मोफत उपचार आणि महिलांसाठी बसमध्ये मोफत बस प्रवास यासारख्या योजना राबवत आहे.
  • 2. महिलांना दरमहा २१०० रुपये मिळतील -  दिल्लीत चौथ्यांदा सत्तेत आल्यानंतर आम आदमी पक्षाने महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. एक हजार रुपयांची तरतूद असलेल्या मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून निवडणुकीनंतर त्याची रक्कम वाढवून २५०० रुपये करण्यात येईल, असे पक्षाने म्हटले आहे.
  • 3. वृद्धांसाठी संजीवनी योजना : आम आदमी पक्षाने दिल्लीतील सर्व वृद्धांसाठी संजीवनी योजना आणण्याचे आश्वासन दिले आहे. याअंतर्गत ६० वर्षांवरील सर्व व्यक्तींना शासकीय व खासगी रुग्णालयात मोफत उपचार देण्यात येणार आहेत.
  • 4. विद्यार्थ्यांनाही मोफत बस प्रवास : आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी तरुणांना मोठे आश्वासन दिले आहे. पुन्हा सरकार स्थापन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवासाचा लाभ दिला जाईल, असे त्यांनी सांगितले आहे. मेट्रोमध्ये ५० टक्के सवलत देण्याचा प्रस्तावही त्यांनी पंतप्रधान मोदींना दिला आहे.
  • 5. पुजारी आणि ग्रंथींना १८,००० रुपये मासिक भत्ता : आम आदमी पक्षाने दिल्लीतील सर्व पुजारी आणि ग्रंथींना दरमहा १८,००० रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर