महाराष्ट्र-हरयाणामध्ये भाजपने षडयंत्र रचून विजय मिळवला? दिल्ली निवडणुकीआधी अरविंद केजरीवालांचा मोठा दावा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  महाराष्ट्र-हरयाणामध्ये भाजपने षडयंत्र रचून विजय मिळवला? दिल्ली निवडणुकीआधी अरविंद केजरीवालांचा मोठा दावा

महाराष्ट्र-हरयाणामध्ये भाजपने षडयंत्र रचून विजय मिळवला? दिल्ली निवडणुकीआधी अरविंद केजरीवालांचा मोठा दावा

Dec 04, 2024 03:51 PM IST

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, दिल्लीमध्ये भाजप मोठ्या प्रमाणात लोकांचे मत कापण्याचा प्रयत्न करताना रंगेहात पकडली गेली.

अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवाल

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आता काही महिन्य़ाचा काळ शिल्लक राहिला आहे. निवडणूक जाहीर होण्याआधीच दिल्लीतील राजकीय वातावरण कमालीचे तापलं आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. केजरीवाल यांनी एक्स वर पोस्ट करताना भाजपवर लोकांची मते कापण्याचा आरोप केला. त्याचबरोबर हरयाणा आणि महाराष्ट्रात भाजपचा विजय म्हणजे षडयंत्र असल्याचे म्हटले. एक्सवरील पोस्टमध्ये अरविंद केजरीवाल यांनी याबाबत मोठा खुलासा करणार असल्याचे म्हटले आहे.

अरविंद केजरीवाल यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, दिल्लीमध्ये भाजप मोठ्या प्रमाणात लोकांचे मत कापण्याचा प्रयत्न करताना रंगेहात पकडली गेली. भाजपने हजारों वोटर्सची मते कापण्यासाठी अर्ज केला होता. लवकरच याबाबत मोठा खुलासा करेन. या लोकांनी हरयाणा आणि महाराष्ट्राची निवडणूकही याच पद्धतीने जिंकली? भाजपवालो मी तुमचा डाव दिल्लीत यशस्वी होऊ देणार नाही," अशी पोस्ट केजरीवालांनी केली.

अरविंद केजरीवाल यांच्या या पोस्टवर भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने अनपेक्षित विजय मिळवला आहे. हरयाणात काँग्रेस मजबूत वाटत असतानाही पंतप्रधान मोदी आणि अमित शहांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजय मिळवला. त्याचबरोबर महाराष्ट्रातही महाविकास आघाडीच्या बाजूने मतप्रवाह होता. सरकारविरोधात जनतेत रोष होता, तरीही जनमत आपल्याकडे आणण्यात भाजप यशस्वी झाला

 

विशेष म्हणजे आम आदमी पार्टी स्थापन केल्यापासून दिल्लीत सत्तेत आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीतही केजरीवालांच्या पक्षाने ७० पैकी ६३ जागांवर विजय मिळवून सत्ता स्थापन केली होती. तर भाजपला केवळ ७ जागा जिंकता आल्या होत्या.काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती. मात्र, त्यानंतर गेल्या पाच वर्षात अरविंद केजरीवालांसह पक्षातील काही नेत्यांवर मद्य घोटाळ्यासह इतर आरोप झाले आहेत. केजरीवालांसह अनेक नेत्यांना तुरुंगातही जावे लागली आहे. त्यामुळेच आता यावेळच्या निवडणुकीला खूप महत्व प्राप्त झाले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर