मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Delhi AIIMS : एम्सचा यू-टर्न! २२जानेवारीला अर्धा दिवस ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला मागे

Delhi AIIMS : एम्सचा यू-टर्न! २२जानेवारीला अर्धा दिवस ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला मागे

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 21, 2024 12:45 PM IST

Delhi AIIMS : दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ने अयोध्येच्या राम मंदिरातील राम लल्लाच्या अभिषेक प्रसंगी सोमवारी (दि २२) अर्धा दिवस ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

Delhi AIIMS
Delhi AIIMS

Delhi AIIMS : दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स)ने सोमवारी राम मंदिरातील राम लल्लाच्या अभिषेक प्रसंगी अर्धा दिवस ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर टीका झाल्यावर एम्स प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून दिवसभर ओपीडी ठेवली जाणार आहे. एम्सचे प्रशासकीय अधिकारी राजेश कुमार यांनी रविवारी या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.

PM Narendra Modi : जिथे राम सेतू बांधला गेला त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली भेट; समुद्र किनाऱ्यावर केली पूजा

मिळालेल्या माहितीनुसार, याआधी शनिवारी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने दिल्लीतील एम्स आणि दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयासह केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी चारही रुग्णालये २२ जानेवारीला दुपारी २.३०वाजेपर्यंत बंद राहतील, असे जाहीर केले होते. या निर्णयावर मोठी टीका झाली होती. यानंतर आता ही रुग्णालये पूर्णवेल सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Ram Temple Inauguration : ‘प्राण-प्रतिष्ठा’ सोहळ्यासाठी सजले अयोध्येतील राम मंदिर; पाहा फोटो

वृत्तसंस्था भाषाच्या वृत्तानुसार, राजधानी दिल्लीतील एम्सच्या अधिकृत सूचनेनुसार, केंद्र सरकारने २२ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली होती. त्यात म्हटले आहे की, "सर्व कर्मचार्‍यांच्या माहितीसाठी कळविण्यात येते की, २२ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत संस्था अर्धा दिवस बंद ठेवली जाणार आहे. सर्व विभागप्रमुखांनी व अधिकार्‍यांनी याची नोंद घ्यावी. या काळात आपत्कालीन सेवा सुरू राहतील. मात्र, आता पुन्हा एम्सने आपल्याच सुट्टीच्या नोटीसीवरुन यूटर्न घेतला आहे. आज नव्या नोटीसीत हा निर्णय मागे घेतला असल्याचे म्हटले आहे.

एम्सच्या अधिकाऱ्याने सांगितले होते की रुग्णांना दिलेला वेळ पुन्हा शेड्यूल केला जात आहे. जर कोणी रुग्ण आला तर आम्ही त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करू. मात्र, सायंकाळची ओपीडी सुरू राहणार आहे.

WhatsApp channel

विभाग