मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  malicious apps : तुमच्या फोनमधून हे १२ ॲप आहेत का? असतील तर तात्काळ डिलीट करा! वैयक्तिक माहितीची होतेय चोरी

malicious apps : तुमच्या फोनमधून हे १२ ॲप आहेत का? असतील तर तात्काळ डिलीट करा! वैयक्तिक माहितीची होतेय चोरी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 03, 2024 01:34 PM IST

malicious apps : मालवेअर ॲप्सच्या माध्यमातून युजर्सचा वैयक्तिक डेटा चोरला जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एकूण १२ ॲप्सपैकी ६ ॲप्स Google Play Store वर असून त्यांना फोनमधून डिलिट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

malicious apps
malicious apps

malicious apps : अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्त्यांना गूगल प्ले स्टोअरच्या माध्यमातून द्वारे लाखो ॲप्स डाउनलोड करण्याचा पर्याय मिळतो. ॲप्स डाउनलोड करण्यासाठी गूगल प्ले स्टोअर हे सर्वात सुरक्षित प्लॅटफॉर्म मानले जाते. मात्र, अनेक धोकादायक ॲप्स प्ले स्टोअरपर्यंत येत असून हे ॲप्स अँड्रॉइड वापरकर्त्यांची खासगी माहिती चोरत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. गूगलने अशा १२ लॅप्सची यादी जाहीर केली असून हे ॲप्स तुमच्या फोनमध्ये असतील तर तातडीने डिलिट करण्यास देखील सांगण्यात आले आहे.

RRB calender 2024 : मुलांनो तयारीला लागा! ग्रुप डी, एनटीपीसीसह सर्व भरतींचे कॅलेंडर रेल्वेने केले जाहीर

ब्लीपिंग कॉम्प्युटरने आपल्या अहवालात अशा १२ ॲप्सचा उल्लेख केला आहे ज्यामध्ये मालवेअर आहे आणि ज्यांच्या मदतीने वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती चोरली जाऊ शकते. यापैकी ६ ॲप्स गुगल प्ले स्टोअरवर असून उर्वरित ॲप्स थर्ड पार्टी ॲप स्टोअर्स किंवा वेबसाइटवरून डाउनलोड करता येतात.

या ॲप्समध्ये डेंजरस ट्रोजन आहे. सायबर सिक्युरिटी कंपनी ईएसईटीने या ॲप्समध्ये असलेल्या धोक्याची माहिती अहवालात दिली आहे. वज्रस्पाय नावाचे रिमोट ऍक्सेस ट्रोजन (आरएटी) या ॲप्समध्ये आहे. या मालवेअरसह, हल्लेखोर पीडितांचा डेटा चोरण्यासाठी पॅचवर्क एपीटी वापरत आहेत.

lalkrushan advani : मोदी सरकारची मोठी घोषणा, लालकृष्ण अडवाणींना मिळणार भारतरत्न

हे ॲप वैयक्तिक डेटा चोरू शकते

मालवेअर असलेल्या ॲप्सपैकी, ११ मेसेजिंग ॲप्स म्हणून जाहिरात करण्यात आली होती, तर एक ॲप न्यूज पोर्टल म्हणून डिव्हाइसवर पोहोचत होता. एकदा डाउनलोड केल्यानंतर, हे ॲप्स संपर्क, मेसेजेस, फाइल्स, डिव्हाइस लोकेशन आणि फोनमधील ॲप्समध्ये प्रवेश करू लागले. मुख्यतः हा मालवेअर पाकिस्तानच्या वापरकर्त्यांना लक्ष्य करत आहे.

ही आहे धोकादायक ॲप्सची यादी

यापैकी कोणतेही ॲप तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल केले असल्यास ते लगेच डिलीट करा.

1. Rafaqat

2. Privee Talk

3. MeetMe

4. Let's Chat

5. Quick Chat

6. Chit Chat

7. Hello Chat

8. Yohoo Talk

9. TikTalk

10. Nidus

11. GlowChat

12. Wave Chat

WhatsApp channel

विभाग