कोणती पेन्शन योजना कर्मचाऱ्यांसाठी जास्त फायदेशीर? यूपीएस, ओपीएस आणि एनपीएसमध्ये फरक काय?-decoding ops vs nps vs ups which pension scheme benefits employees the most ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  कोणती पेन्शन योजना कर्मचाऱ्यांसाठी जास्त फायदेशीर? यूपीएस, ओपीएस आणि एनपीएसमध्ये फरक काय?

कोणती पेन्शन योजना कर्मचाऱ्यांसाठी जास्त फायदेशीर? यूपीएस, ओपीएस आणि एनपीएसमध्ये फरक काय?

Aug 25, 2024 04:45 PM IST

OPS vs NPS vs UPS: केंद्र सरकारने युनिफाइड पेन्शन स्कीम या नव्या पेन्शन योजनेला शनिवारी मंजुरी दिली.

कोणत्या पेन्शन योजनेचा कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फायदा मिळतोय?
कोणत्या पेन्शन योजनेचा कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फायदा मिळतोय?

Unified Pension Scheme: मोदी सरकारने युनिफाइड पेन्शन स्कीम या नव्या पेन्शन योजनेला शनिवारी मंजुरी दिली आहे, जी ०१ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे. युनिफाइड पेन्शन योजना काय आहे? आणि यूपीएस, ओपीएस आणि एनपीएस यात नेमका फरक आहे, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

एप्रिल २०२३ मध्ये तत्कालीन अर्थ सचिव टी. व्ही. सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने युनिफाइड पेन्शन योजनेची शिफारस केली होती, ज्याला शनिवारी मोदी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यूपीएसचे पाच भाग आहेत, ज्यात खात्रीशीर पेन्शन, खात्रीशीर कौटुंबिक पेन्शन, खात्रीशीर किमान पेन्शन, महागाई संलग्न निर्देशांक आणि निवृत्तीनंतर ग्रॅच्युइटी यांचा समावेश आहे.

युनिफाइड पेन्शन योजनेमुळे सरकारी कर्मचार्‍यांना खात्रीशीर पेन्शन मिळणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, युनिफाइड पेन्शन योजनेची पाच प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. 

 खात्रीशीर पेन्शन: २५ वर्ष नोकरी केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होण्याआधी शेवटच्या वर्षात (१२ महिने) मूळ वेतनाच्या ५० टक्के रक्कम पेन्शन मिळून मिळेल.

 खात्रीशीर किमान पेन्शन: किमान १० वर्ष नोकरी केलेल्या सरकारी कर्मचाऱ्याला दरमह १० हजार निवृत्तिवेतन मिळेल.

खात्रीशीर कौटुंबिक निवृत्तिवेतन: निवृत व्यक्तीच्या मृत्युनंतर त्याच्या जवळच्या नातेवाईकांना पेन्शनच्या ६० टक्के रक्कम मिळेल.

महागाई निर्देशांक: या तिन्ही पेन्शन योजनांमध्ये महागाई सवलत असेल.

सेवानिवृत्तीवेळी एकरकमी पैसे: निवृत्तीनंतर ग्रॅच्युईटीशिवाय एकरकमी पैसे दिले जातील.

या योजनेला विरोध का?

दरम्यान, २०१४ मध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकारने एनपीएस लागू केले. २००४ पूर्वी नोकरी करणाऱ्यांना आजही जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळत आहे. जम्मू-काश्मीर, हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्राने नवीन पेन्शन योजनेची केलेली घोषणा ही एक मोठी राजकीय घडामोड आहे.

नवीन आणि जुन्या पेन्शन योजनेत काय फरक?

- जुन्या पेन्शन योजनेत पगारातून कोणतीही कपात केली जात नाही. मात्र, नवीन पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांच्या पगारातून १० टक्के कपात केली जाणार आहे. जी नंतर पेन्शन म्हणून दिली जाईल.

- जुन्या पेन्शन योजनेत निम्मी रक्कम निवृत्तीनंतर दिली जात होती. त्यानंतर आयुष्यभर पेन्शनच्या स्वरूपात मिळते.

- जुन्या पेन्शन योजनेत सामान्य भविष्य निर्वाह निधीचीही सुविधा आहे, जी नवीन पेन्शन योजनेत नाही.

- जुन्या पेन्शन योजनेत सरकारी तिजोरीतून पेन्शनची रक्कम दिली जात होती. परंतु, नवीन पेन्शन योजनेत पेन्शन हे शेअर बाजारावर अवलंबून आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर पेन्शन म्हणून किती रक्कम मिळणार आहे? हे आधी कळत नाही.

- जुन्या पेन्शन योजनेत ६ महिन्यांनंतर महागाई भत्ता वाढतो, जो नवीन पेन्शन योजनेत मिळत नाही.

विभाग