Viral News : एका व्यक्तिला सलग काम करणं जिवावर बेतलं आहे. त्यानं रजा देखील घेतली नाही. यामुळे त्याच्या शरीरातील अवयवांनी काम करणं थांबवलं. यामुळे त्याचा मृत्यू झाला. चीनमधील या व्यक्तीने तब्बल १०४ दिवस सलग काम केले. या काळात त्यांनी केवळ एका दिवसाची रजा घेतली. साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, मृताचे नाव आबाओ असे आहे. तो चित्रकार होता. त्याला काम केल्यानं न्यूमोकोकल संसर्ग झाला व यात तो आजारी पडून त्याच्या मृत्यू झाला.
बाओने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये एका कंपनीसोबत करार केला होता. यावर्षी जानेवारीपर्यंत काम पूर्ण करू, असे लेखी आश्वासन त्याने दिले होते. यानंतर त्याला झौशान शहरात रंग रंगोटीचे काम देण्यात आले. त्यानंतर हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी त्याने गेल्या वर्षी फेब्रुवारी ते मे या कालावधीत सलग काम केले. ६ एप्रिलच्या दरम्यान फक्त एक दिवस सुट्टी त्याने घेतली होती. यानंतर २५ मे रोजी त्यांची प्रकृती ढासळू लागली. प्रकृती हळूहळू खराब होत गेली. २८ मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी फुफ्फुसाच्या संसर्गासह मल्टीऑर्गन फेल्युअर झाल्याचे निदान केले. यानंतर १ जून रोजीच बाओचा मृत्यू झाला.
बाओच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे बाओला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, हा कामाशी संबंधित आजार नसल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. सतत काम केल्यामुळे त्यांना विश्रांतीसाठी वेळ मिळाला नाही आणि त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
कंपनीचे म्हणणे आहे की ए'बाओ यांना जास्त काम दिले गेले नाही. कंपनीकडून कामाचा दबाव नव्हता. तो त्याच्या इच्छेपेक्षा जास्त काम करत होता. न्यूमोकोकल संसर्गाचे कारण कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असल्याचे न्यायालयाने आढळले. सलग १०४ दिवस काम करणे हे चीनच्या कामगार कायद्याचे उल्लंघन असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. चिनी नियमांनुसार, दिवसात फक्त ८ तास आणि आठवड्यातून ४४ दिवस काम करण्याची परवानगी आहे. कंपनीला बाओच्या कुटुंबाला ४ दशलक्ष युआनची भरपाई द्यावी लागेल, असा निकाल न्यायालयाने दिला. याशिवाय १० हजार युआन वेगळे द्यावे लागणार आहे.