DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणखी वाढणार, केंद्रानं दिले संकेत
Central Govt employee Dearness Allowance Hike : चालू आर्थिक वर्षात केंद्रातील मोदी सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
Central Govt Employees DA Salary Hike : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रातील मोदी सरकार लवकरच देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देणार असल्याची माहिती समोर आली आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार असून त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळं आता देशातील एक कोटींहून अधिक सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांन मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रातील मोदी सरकार महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ होणार करण्याच्या विचारात आहे. परिणामी देशातील सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग न्यूज
देशातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या ४२ टक्के इतका महागाई भत्ता दिला जातो. येत्या काही महिन्यात त्यात आणखी तीन टक्क्यांची वाढ करण्यात येणार असल्याची माहिती आहे. जून २०२३ ते ३१ जुलै २०२३ पर्यंत सरकारकडून महागाई भत्त्यात तब्बल चार टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पहिल्या डीएचा कार्यकाळ संपला असून आता लवकरच चालू आर्थिक वर्षासाठी पुन्हा डीएमध्ये तीन टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं आता देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच अच्छे दिन येण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारकडून दर दोन वर्षांनंतर महागाई भत्ता वाढवण्यात येत असतो. गेल्या वर्षी मार्चमध्ये महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी २०२३ पासून नवा डीए नियम लागू करण्यात आला होता. त्यानंतर आता येत्या एक ते दोन महिन्यांत केंद्र सरकार पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं महागाईच्या झळा सोसत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.