मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  धक्कादायक..! अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॅन्टीनच्या जेवणात आढळला मृत साप, ११ जण रुग्णालयात दाखल

धक्कादायक..! अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॅन्टीनच्या जेवणात आढळला मृत साप, ११ जण रुग्णालयात दाखल

Jun 18, 2024 10:39 PM IST

Dead snake found in canteen food : कॅन्टीनमधील जेवणाचा एक फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. त्यामध्ये जेवणात सापासारखा प्राणी दिसत होता.

वसतीगृहातील जेवणात आढळला मेलेला साप
वसतीगृहातील जेवणात आढळला मेलेला साप (X/ @FFire1008)

बिहारमधील बांका येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेसमध्ये देण्यात आलेल्या जेवणात मृत साप आढळल्याचा धक्कादायक दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. त्याचबरोबर मेसमधील अन्न खाल्ल्यानंतर ११ विद्यार्थी आजारी पडले आहेत. मळमळ. चक्कर आणि उलट्यांचा त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मेसमधील या जेवणाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये  जेवणात सापासारखा प्राणी दिसत होता.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर कॉलेज प्रशासनाने तातडीने कारवाई केली. त्यात खाद्यपदार्थ विक्रेते बदलून आरोपींना दंड ठोठावण्यात आला. तसेच मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी दररोज विद्यार्थ्यांसोबत जेवण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मुंबईतील एका डॉक्टरला त्यांच्या बटरस्कॉच आईस्क्रीम कोनमध्ये मानवी बोटाचा अर्धा इंचाचा तुकडा सापडला होता, जो ऑनलाइन मागवण्यात आला होता. १२ जून रोजी ब्रेंडन फेरराव (२६) यांनी मालाड पोलिसांत तक्रार दाखल केली होती आणि आईस्क्रीमविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम २७२, २७३ आणि ३३६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

इंदापूर येथील फॉर्च्युन डेअरी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत हे आईस्क्रीम तयार करण्यात आल्याचा दावा कंपनी व्यवस्थापनाने केला आहे.

त्यानंतर भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (एफएसएसएआय) आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी इंदापूर आणि हडपसर येथील कारखान्यांना भेट दिली. त्यानंतर एफएसएसएआयने फॉर्च्युन डेअरी इंडस्ट्रीजचा परवाना निलंबित केला.

दुसऱ्या एका घटनेत नोएडाच्या एका महिलेने इन्स्टंट डिलिव्हरी अॅपद्वारे ऑर्डर केलेल्या आईस्क्रीम टबमध्ये सेंटीपीड (गोम) सापडल्याचा दावा केला आहे. नोएडा अन्न सुरक्षा विभागाने महिलेच्या सोशल मीडिया पोस्टची स्वत: दखल घेतली आणि तिच्याशी संपर्क साधला. अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी चाचणीसाठी इन्स्टंट डिलिव्हरी कंपनीच्या स्टोअरमधून ब्रँडच्या आईस्क्रीमचे नमुने गोळा केले आहेत.

त्याचबरोबर एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाला देण्यात आलेल्या जेवणात मेटल ब्लेड सापडल्याचा प्रकार समोर आला आहे. एअर इंडियाचे चीफ कस्टमर एक्सपीरियंस ऑफिसर राजेश डोगरा यांनी सांगितले की, ही वस्तू कॅटरिंग पार्टनरने वापरलेल्या भाजीपाला प्रोसेसिंग मशीनमधील आहे. भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये म्हणून कंपनीने आपल्या केटरिंग पार्टनरला भाजीपाला तपासणी, प्रक्रिया आणि कापणीची तपासणी करण्यासाठी यंत्रणा मजबूत करण्यास सांगितले आहे.

WhatsApp channel
विभाग