एका इंटरनेट कॅफेतील (internet cafe) कर्मचाऱ्यांना ३० तास माहिती नव्हती की, एका २९ वर्षीय तरुणाचा त्यांच्या कॅफेतच मृत्यू झाला आहे; त्यांना वाटले ते झोपी गेले आहेत. ही घटना पूर्व चीनमधील आहे. १ जून रोजी हा व्यक्ती झेजियांग प्रांतातील वेनझोऊ येथील कॅफेमध्ये गेला आणि व्हिडिओ गेम खेळण्यात बराच वेळ घालवला. ३ जून रोजी रात्री १० वाजता एका कॅफे कर्मचाऱ्याला समजले की, तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याने पोलिसांशी संपर्क साधून याची माहिती दिली. कॉम्प्युटर डेस्कवर पडलेल्या व्यक्तीला हलवले तरी त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही.
तरुणाचे शरीर थंड पडल्याचे लक्षात आल्याने पोलिसांना फोन केल्याचे कामगाराने तक्रारीत म्हटले आहे. ज्या व्यक्तीची ओळख लोकांसमोर उघड झाली नाही, तो याआधी २ जून रोजी सकाळी ६ वाजता कॅफेतून नाश्ता आणण्यासाठी बाहेर पडला होता. साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, या व्यक्तीचे मेहुणे चेन यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबीयांनी पॅथॉलॉजिस्टना शवविच्छेदन करण्यास मनाई केली होती, त्यामुळे मृत्यूची नेमकी वेळ निश्चित करणे अशक्य आहे.
चेन यांनी आउटलेटला सांगितले की, "तो बंदिस्त केबिन ऐवजी मोकळ्या जागेत बसला होता. ते काहीच हालचाल करत नसल्याचे पाहून कर्मचाऱ्यांच्या लक्षात वेळीच ही बाब यायली हवी होती. त्याचे विचित्र वर्तन लक्षात घ्यायला हवे होते.
इंटरनेट कॅफेच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला तो एक नियमित ग्राहक होता जो दररोज येत असे आणि एका वेळी सुमारे सहा तास थांबत असे. मॅनेजरने सांगितले की, दिसताना तो तरुण निरोगी दिसत होता. इंटरनेट कॅफेच्या मालकाने साऊथ चायना मॉर्निंग पोस्टला सांगितले की, कर्मचाऱ्यांना वाटले की ते विश्रांती घेत आहेत, म्हणून त्यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला नाही. अनेकदा झोपलेल्या ग्राहकाला उठवल्यावर ते चिडचिडे होतात आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करतात. यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यांना झोपू दिले. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
संबंधित बातम्या