मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Dead Man Returns Home : मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार, तेराव्याच्या दिवशी त्याला जिवंत पाहून सर्व कुटुंब अचंबित!

Dead Man Returns Home : मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार, तेराव्याच्या दिवशी त्याला जिवंत पाहून सर्व कुटुंब अचंबित!

Jun 12, 2024 10:26 AM IST

Dead man returns home in Madhya Pradesh: मध्य प्रदेशमध्ये ज्या मुलावर कुटुंबाने अंत्यसंस्कार केले, त्याच्या तेराव्याच्या दिवशी तोच जिवंत परतला, त्याला पाहून सर्व कुटुंब आश्चर्चचकीत झाले.

 मध्य प्रदेशमध्ये मृत तरुण त्याच्या तेराव्या दिवशी घरी परतला.
मध्य प्रदेशमध्ये मृत तरुण त्याच्या तेराव्या दिवशी घरी परतला.

Dead Madhya Pradesh man returns home on his terhavi: मध्य प्रेदशच्या भोपाळमध्ये तरुणाच्या मृत्युनंतर कुटुंबाने त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आणि तेराव्याच्या दिवशी तोच मुलगा आपल्या घरी परतला. त्याला पाहून सर्व कुटुंब अचंबित झाले.सुरेंद्र दीनदयाल शर्मा असे संबंधित तरुणाचे नाव आहे. सुरेंद्रवर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याच्या तेराव्याची तयारी करत असताना त्याला जिवंत पाहून कुटुंबाला खूप आनंद झाला. मग दीनदयाल शर्मा यांच्या कुटुंबाने ज्या तरुणावर अंत्यसंस्कार केले, तो कोण होता? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. हे धक्कादायक प्रकरण श्योपूरच्या लहचौडा गावातील आहे.

नेमकं प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील सवाई माधोपूरजवळील सुरवळ येथे अज्ञात तरुणाचा अपघात झाला. अपघाताचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला. दीनदयाल शर्मा यांच्या कुटुंबीयांना सोशल मीडियाच्या माध्यमातून हा फोटो मिळाला. कुटुंबांना अपघातात जखमी झालेल्या तरुणाची ओळख त्यांचा मुलगा सुरेंद्र शर्मा अशी केली. यानंतर कुटुंबाने सवाई माधोपूरला पोहोचल्यावर डॉक्टरांनी तरुणाला जयपूरला हलवण्यात आल्याचे सांगितले. जेव्हा कुटुंब जयपूरला पोहोचले, तेव्हा डॉक्टरांनी सुरेंद्रचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगितले.

ट्रेंडिंग न्यूज

२८ मे रोजी अंत्यसंस्कार

मृत्यूनंतर तरुणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर पोलीस आणि रुग्णालय व्यवस्थापनाने तरुणाचा मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिला. २८ मे रोजी लहचोडा येथे कुटुंबाने मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले. मात्र, तेराव्याची तयारी सुरू असताना सुरेंद्र घरी परतला. सुरेंद्रला पाहून संपूर्ण गाव आश्चर्यचकित झाले.

दोन महिन्यांनंतर कुटुंबाशी संपर्क

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र शर्मा जयपूरमधील एका कपड्याच्या कारखान्यात सुपरवायझर म्हणून काम करतो. सुरेंद्र गेल्या महिन्यात सुट्टी घेऊन त्याच्या घरी आला होता. सुट्टी संपल्यानंतर तो पु्न्हा जयपूरला परतला. पण त्याचा मोबाईल खराब झाल्याने तो दोन महिन्यापासून कुटुंबाशी संपर्क साधू शकला नाही. सुरेंद्र त्याच्या कुटुंबीयांना भेटला तेव्हा घडलेला सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला.

कोणाच्या मृतदेहावर अंतिम संस्कार झाले?

सुरेंद्रची आई कृष्णा देवी म्हणाली की, नुकतीच माहिती मिळाल्यानंतर आमच्या घरातील लोकांनी अज्ञात मृतदेह सुरेंद्रचा असल्याचे डॉक्टरांना सांगितले आणि त्याचा मृतदेह गावात आणून अंत्यसंस्कार केले. जेव्हा तिला तिच्या मुलाचा फोन आला, तेव्हा तिचा विश्वास बसत नाही. पण आता ती खूप खुश आहे. पण ज्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले, ती व्यक्ती कोण होती? कुटुंबीयांनी पोलिसांना कळवले का? पोलिस तपासानंतरच हे स्पष्ट होईल.

WhatsApp channel
विभाग