dawood ibrahim brother in law shot dead in up : उत्तर प्रदेशातील जलालाबाद येथे आपल्या पुतण्याच्या लग्नाला गेलेल्या निहाल खान (वय ३५)ची बुधवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. निहाल खान हा दुसरा कोणी नसून फरार डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचा मेहुणा होता. निहाल हा जलालाबादचे चेअरमन शकील खानच्या बायकोचा भाऊ होता.
२०१६ मध्ये निहाल शकीलच्या भाचीसोबत पळून गेला होता. मात्र, या नंतर दोघांमध्ये समेट झाला होता. याबात शकीलने सांगितले की, निहाल हा १५ फेब्रुवारीला विमानाने जाणार होता. मात्र, त्याची फ्लाइट चुकली. यामुळे तो रस्ते मार्गाने गेला. मात्र, २०१६ च्या प्रकरणामुळे त्याच्यावरचा राग कायम असल्याने त्याचा बदला घ्यायचा होता."
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम याला विषबाधा झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. दाऊदला कराचीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही बातमी समोर आल्यानंतर पाकिस्तानमध्ये फेसबुक, एक्स (पूर्वीचे ट्विटर), यूट्यूब आणि गुगल सेवा डाउन झाल्या होत्या. दाऊद हा गंभीर आजाराने ग्रस्त असल्याची माहिती आहे.
दरम्यान, दाऊदला विषबाधा होऊन तो गंभीर असल्याचा दावा सोशल मिडियावर करण्यात आला होता. त्याला उपचारासाठी कराचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र पाकिस्तानात त्याच्याबद्दल माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. त्याच्या प्रकृतिविषयी कोणत्याही सरकारी माध्यमाने अथवा एजन्सीने दुजोरा दिला नव्हता.
१९९३ मध्ये मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेचे अधिकारी असलेले प्रवीण वानखेडे म्हणाले की, पाकिस्तानने भारत विरोधी कारवाया करणाऱ्यांना नेहमीच आश्रय दिल आहे. भारतात अस्थिरता पसरवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. पाकिस्तानच्या मदतीने त्याने देशाच्या विविध भागात ड्रग्ज, शस्त्रे आणि दहशतीचे जाळे निर्माण केले. आयएसआय प्रमुख जनरल जावेद नासिर यांनी १९९३ मध्ये दाऊद इब्राहिमला दिलेल्या पाठिंब्यामुळे त्याचे अवैध साम्राज्य निर्माण केले. तसेच १९९३ चे मुंबई बॉम्बस्फोट देखील तत्कालीन आयएसआय प्रमुख जनरल जावेद नासीर यांच्या सूचनेवरून करण्यात आले होते.