गुजरात राज्यील जुनागडमध्ये एक २० वर्षापूर्वीची मशीद जमीनदोस्त करण्यात आली. शनिवारी रात्री जवळपास १ हजार पोलीस कर्मचाऱ्यांच्या तैनातीत बुलडोझरने कारवाई करण्यात आली. मागच्या वर्षीही प्रशासनाने ही मशीद पाडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तेव्हा हिंसक जमावाने पथकावर दगडफेक करत अनेक वाहनांना आगी लावल्या होत्या. या हिंसेत अनेक लोक जखमी झाले होते. आता ही मशीद पाडण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रशासनाने दोन मंदिरेही पाडली आहेत.
जी मशीद पाडण्यात आली ती जुनागडमधील मझवेड़ी गेटजवळ होती. मध्य रात्री २ वाजण्याच्या सुमारास जवळपास १००० पोलीस कर्मचारी या मशीद परिसरात दाखल झाले. संपूर्ण परिसराची घेराबंदी करत ठिकाठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले. तीन तास बुलडोझर चालले व सकाळी पाच वाजेपर्यंत प्रशासनाने मशीद जमीनदोस्त केली. ही मशीद रस्त्याच्या मधोमध अवैध पद्धतीने बांधली होती.
मिळालेल्या माहितीनुसार २० वर्षे जुनी ही मशीद पाडण्याचा प्रयत्न गेल्यावर्षीही करण्यात आला होता. मात्र त्यावेळी संतप्त जमावाने पथकाला परत पाठवले होते. जमावाने पोलीस चौकीवर हल्ला करत तोडफोड केली होती. या घटनेनंतर ९ महिन्यांनी पोलीस दल तेथे दाखल झाले व रात्रीच्या वेळी मशीद पाडली.
जुनागडमधील अवैध मशिदीसोबतच वेगवेगळ्या ठिकाणी बांधण्यात आलेली २ मंदिरेही पाडण्यात आली. सर्व ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मागील महिन्यात उत्तराखंड राज्यातील हल्द्वानी येथे अवैध मदरशावर कारवाई करताना पोलीस पथकावर जमावाने दगड व पेट्रोल बॉम्बने हल्ला केला होता. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला होता. हिंसेनंतर हल्द्वानीमध्ये जमावबंदी लागू केली होती. पोलिसांनी या हिसेंचा मास्टरमाइंड अब्दुल मलिक याला अटक केली आहे.
संबंधित बातम्या