Dangerous Asteroid may hit India : पृथ्वीच्या दिशेने एक मोठ संकट वेगानं येत आहे. एक मोठा लघुग्रह पृथ्वीला धडकण्याची शक्यता नासाने वर्तवली असून याचा सर्वाधिक धोका हा भारत आणि चीनला आहे. जर हा लघुग्रह कोसळल्यास भारतात मोठा विध्वसं होऊ शकतो.
पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या एका मोठ्या लघुग्रहाबाबत शास्त्रज्ञांनी भयावह भविष्यवाणी केली आहे. या लघुग्रहाला लघुग्रह २०२४ वायआर ४ असे नाव देण्यात आले आहे. हा एका मोठ्या विमानाचा आकाराचा खडक असून तो २०३२ मध्ये पृथ्वीच्या जवळून जाणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. यावेळी मोठा स्फोट होण्याची ही शक्यता आहे. पृथ्वीच्या वातावरणात या लघुग्रहाने प्रवेश केल्यास त्याचा वेग ताशी ३८ हजार किलोमीटर असेल. त्याचबरोबर या लघुग्रहामुळे अनेक शहरे उद्ध्वस्त होतील. चीन, पाकिस्तान आणि भारताला या लघुग्रहाचा सर्वाधिक धोका असल्याचं शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे. चीनने या लघुग्रहाचा सामना करण्यासाठी शास्त्रज्ञांची एक टिक सज्ज केली आहे.
हा लघुग्रह ४० ते १०० मीटर रुंद असू शकतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. गणनेनुसार सुरवातीला हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता केवळ १.३ टक्के होती. पण आता हा लघुग्रह पृथ्वीला धडकण्याची शक्यता २ टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहे. स्पष्ट सांगायचे झाल्यास हा लघुग्रह पृथ्वीवर आदळल्याशिवाय निघून जाण्याची ९८ टक्के शक्यता आहे. हा ग्रहपृथ्वीवर धडकेलच याची देखील शास्वती नाही. नासाचे शास्त्रज्ञ या लघुग्रहाच्या हालचालीवर लक्ष ठेऊन असून त्याचा अभ्यास केला जात आहे.
नासा आणि ईएसएने दुर्बिणीच्या साहाय्याने मार्चमध्ये या लघुग्रहावर बारकाईने नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर २०२८ मध्ये हा लघुग्रह शास्त्रज्ञांना अधिक अचूकपणे पाहता येणार आहे. तसेच त्याच्या वेगाचा व दिशेचा योग्य अभ्यास करून तो पृथ्वीवर कोसलेल की नाही याचा देखील अचूक अंदाज बांधता येणार आहे. तसेच त्याचा आकार, वेग आणि रचना याची देखील अचूक माहिती मिळवता येणार आहे.
हा लघुग्रह पृथ्वीला धडकला तर वातावरणात त्याचा स्फोट होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या स्फोटामुळे ८० लाख टन टीएमटी बाहेर पडेल, जे हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा ५०० पट अधिक असेल. या स्फोटामुळे ५० किलोमीटरच्या परिघातील सर्व काही उद्ध्वस्त होणार आहे. हा धोका आफ्रिका, दक्षिण आशियात आहे. यात भारतासह अनेक देशांचा समावेश आहे. बांगलादेश, पाकिस्तान, नायजेरिया, व्हेनेझुएला, कोलंबिया, इक्वेडोर आणि इथिओपिया, सुदान यांनाही या लघुग्रहाचा मोठा धोका आहे.
संबंधित बातम्या