मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News: 'बाप' रे! सिलिंगला लावलेला फुगा काढण्यासाठी बापानं मुलाला चक्क हवेत फेकलं!

Viral News: 'बाप' रे! सिलिंगला लावलेला फुगा काढण्यासाठी बापानं मुलाला चक्क हवेत फेकलं!

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Nov 25, 2022 12:32 PM IST

Viral Video: इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यात एक बाप घराच्या छताला चिकटलेला फुगा काढण्यासाठी मुलाला वर फेकताना दिसतो.

फुगा काढण्यासाठी बापाने मुलाला फेकलं, व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या उलट-सुलट प्रतिक्रिया
फुगा काढण्यासाठी बापाने मुलाला फेकलं, व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या उलट-सुलट प्रतिक्रिया

Viral Video: लहान मुलांना त्यांचे पालक फुलासारखं जपत असतात. त्यामुळे मुलांना साधं खरचटू नये याची काळजी पालकांकडून घेतली जाते. पण सध्या इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यात एक बाप घराच्या छताला चिकटलेला फुगा काढण्यासाठी मुलाला वर फेकताना दिसतो. सुदैवाने या मुलाला बापाने नंतर झेलले. याचा व्हिडीओ शेअर करताना एका सोशल मीडिया युजरने आईला सांगू नका असं म्हटलं आहे.

व्हिडीओवर सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यात फुगा काढण्यासाठी वडिलांनी केलेल्या क्रिएटीव्हपणाचं कौतुक केलं जातंय. तर काहींनी असं म्हटलं की, व्हिडीओत दिसणाऱ्या मुलांपैकी कुणीतर हे आईला नक्की सांगेल.

काही युजर्सनी हे धक्कादायक असल्याचं म्हटलंय. चिमुकल्याचा जीव धोक्यात घालून फुगा काढल्याचं काहींनी म्हटलं. बहुतांश युजर्सनी मात्र मुलाने हे एन्जॉय केल्याचं म्हटलंय. तसंच आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहील असा क्षण आहे असंही काहींनी म्हटलं.

फक्त वडिलांनी मुलाला ज्या पद्धतीने वर फेकलं आणि झेललं त्याचं कौतुक होतंय असं नाही. तर मुलाने कौशल्याने वरती असलेला फुगा घट्ट पकडला त्याचेही कौतुक होत आहे. व्हिडीओतील त्या मुलाचे आणि वडिलांचे नाव समजू शकले नाही. पण त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

WhatsApp channel

विभाग