उत्तर प्रदेश राज्यातील मुरादाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४ वर्षाच्या चिरमुरडीने आपल्या आजीला व्हिडिओ कॉल करून आईल्या आईत्या हत्येचे रहस्य समोर आणले. या कॉलमध्ये मुलीने असे काही सांगितले की, ते ऐकून आजीच्या पायाखालची जमीनच सरकली. बुधवारी रात्रीच्या सुमारास चार वर्षाच्या चिमुकलीने आपल्या आजीला व्हिडियो कॉल केला व फोन वरती करून आई लटकलेले दृष्य दाखवले. मुलीने सांगितले की, पप्पाने मम्मीला लटकवले असून मम्मी काहीच बोलत नाही, हालत नाही की डुलत नाही. फोनच्या स्क्रीनवर दिसत होते की, तिच्या आईचा मृतदेह लटकलेला आहे.
हे भयंकार दृष्य पाहून मुलीच्या आजीला धक्का बसला, तिने वेळ न दवडता पोलीस आणि अन्य नातेवाईकांना याची माहिती दिली. नातेवाईक तत्काळ गाझियाबादवरून मुरादाबादकडे रवाना झाले. पोलिसही माहिती मिळताच घटनास्थली दाखल झाले. घटनेचा तपास केल्यानंतर महिलेच्या हत्येचा प्रकार समोर आला. आरोपी रोहित कुमार याला गुरुवारी पहाटेच्या सुमारास टक करण्यात आली. रोहित गाझियाबादमधील मोदीनगरमधील एक सॉफ्टवेअर इंजीनिअर आहे.
मृत महिला रूबी रानी (वय ३५) मुरादाबादमधील कुंदरकी ब्लॉक येथील बिकमपूर कुलवाडा येथे प्राथमिक शाळेतील शिक्षिका होती. गाझियाबादमधील मुरादनगर येथे राहणाऱ्या रूबीचा २०१९ मध्ये रोहितशी विवाह झाला होता. ती आपल्या मुलीसह मुरादाबाद येथील बुद्धी विहार कॉलनीमध्ये भाड्याच्या घरात रहात होती.
पोलीस तपास करत आहेत की, मुलीच्या व्हिडिओ कॉलआधी काय घडलं होते. पोलीस अधीक्षक रणविजय सिंह यांनी सांगितले की, पोलीस आणि फॉरेंसिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली आहे. पोलिसांनी रोहितला ताब्यात घेतलं आहे. गुन्हा नोंद करून पोस्टमार्टम रिपोर्टच्या आधारावर तपास केला जाणार आहे.
नातेवाईकांनी आरोप केला आहे की, रुबीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली आहे. आत्महत्या भासवण्याचा बनाव केला जात आहे. त्यांचा आरोप आहे की, रोहित रूबीला पैशासाठी छळत होता. दाम्पत्यामध्ये वारंवार खटके उडत होते. बुधवार सायंकाळी त्याने यूपीआयच्या माध्यमातून रुबीच्या बँक खात्यातून ५० हजार रुपये आपल्या खात्यात ट्रान्सफर केले होते.
दोघांचे मोदीनगरमध्ये एक घरही आहे. रोहिने पैसे देणे बंद केल्यापासून रूबी एकटीच घराच्या कर्जाचे हफ्ते फेडत होती. तिच्या आईवडिलांनी पोलिसांना सांगितले की, रोहितला ते घर विकायचे होते. मात्र तिने याला नकार दिला होता.
चिमुकलीच्या आजी-आजोबांनी पोलिसांना व्हिडिओ कॉलबाबतही सांगितले. कुटूंबीयांचे म्हणणे आहे की, रोहितने रूबीची हत्या केली व फासावर लटकवून आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न केला. रुबीने आत्महत्या केली असावी, या दृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, रूबीने घटनेच्या आधी रोहितला फोन केला होता आणि त्याला आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी रोहितचा मोबाइल फोन, लॅपटॉप आणि अन्य इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त केले आहेत.
संबंधित बातम्या