DA Hike : सणासुदीत सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट, पगारात घसघशीत वाढ होणार
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  DA Hike : सणासुदीत सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट, पगारात घसघशीत वाढ होणार

DA Hike : सणासुदीत सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट, पगारात घसघशीत वाढ होणार

Published Sep 20, 2023 12:38 PM IST

DA Hike Salary : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण आता येत्या काही दिवसांतच नोकरदारांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.

DA Hike Salary Update News
DA Hike Salary Update News (HT)

DA Hike Salary Update News : महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जात असतानाच आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात मोठी वाढ होणार असल्याचे संकेत केंद्रातील मोदी सरकारने दिले आहे. सध्या मिळत असलेल्या ४२ टक्के डीएत आणखी तीन टक्क्यांची वाढ होणार असून कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. जानेवारी आणि जुलै महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली होती. जुलैत वाढवण्यात आलेल्या डीएची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळं नोकरदारांच्या पगारात घसघशीत वाढ होणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ होणार असून यात आणखी एक टक्का वाढ करण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती ऑल इंडिया रेल्वेमेन फेडरेशनचे महासचिव शिव गोपाल मिश्रा यांनी दिली आहे. कोरोनाकाळात केंद्रातील मोदी सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात कोणतीही वाढ केलेली नव्हती. परिणामी केंद्र सरकारच्या ४०० कोटी रुपयांची बचत झाली होती. परंतु आता गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक थकीत भत्ता खात्यात जमा करण्याची मागणी करत आहे. त्यामुळं आता थकीत बाकी मिळणार नाही, परंतु महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ करण्यात येणार असल्याचं मोदी सरकारकडून लोकसभेत सांगण्यात आलं आहे.

कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार?

एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचं मूळ वेतन ३६५०० असेल तर त्याला महागाई भत्ता ११०० रुपये मिळणार आहे. पूर्वीच्या वाढीसह कर्मचाऱ्याच्या वेतनात १५ ते १६ हजार रुपयांची वाढ होणार आहे. जानेवारी आणि जुलै महिन्यातील थकबाकी आणि सध्या जारी करण्यात आलेला तीन टक्क्यांचा महागाई भत्ता या दोन्हींचं गणित एकत्र केल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी १५ ते २० हजार रुपयांची वाढ अपेक्षित आहे. परंतु थकबाकी बाबत सरकारच्या पुढील काही निर्णयांवर कर्मचाऱ्यांचं वेतन अवलंबून असणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर