Cyclone Remal Updates : रेमल चक्रीवादळामुळे आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Cyclone Remal Updates : रेमल चक्रीवादळामुळे आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Cyclone Remal Updates : रेमल चक्रीवादळामुळे आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

May 28, 2024 03:37 PM IST

Cyclone Remal Deaths: रेमल चक्रीवादळामुळे आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Cyclone Remal kills 16 in India, Bangladesh (Photo by Munir Uz Zaman / AFP)
Cyclone Remal kills 16 in India, Bangladesh (Photo by Munir Uz Zaman / AFP) (AFP)

Cyclone Remal Death Toll: बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्याजवळ धडकलेल्या रेमल चक्रीवादळामुळे आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये भारत आणि बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. रेमल चक्रीवादळामुळे अनेक भागांत वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

ताशी १३५ किमी वेगाने वाहणारे हे वादळ रविवारी रात्री नऊच्या सुमारास बांगलादेशच्या दक्षिणेकडील मोंगला बंदर आणि लगतच्या पश्चिम बंगालमधील सागर बेटांच्या आसपासच्या भागात धडकले, अशी माहिती हवामान अधिकाऱ्यांनी दिली.

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, रेमल चक्रवादळामुळे भारतात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, उर्वरित मृत्यू पश्चिम बंगालमध्ये झाला. मदत निवारा केंद्रात नेत असताना काहींचा मृत्यू झाला. तर, काहींचा बुडून मृत्यू झाला किंवा प्रचंड पाणी साचल्याने आणि वादळामुळे त्यांची घरे कोसळली, असे अधिकाऱ्याने सांगितले.

पश्चिम बंगालमध्ये विजेचा धक्का लागून चार जणांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृतांचा आकडा सहा वर पोहोचला आहे. वादळाचा फटका वीजवाहिन्यांनाही बसला असून किनारपट्टीवरील अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. रेमल चक्रीवादळामुळे बांगलादेशात सुमारे ३० लाख तर पश्चिम बंगालमध्ये हजारो लोकांचा वीजपुरवठा खंडीत झाला. १२०० विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. तर, ३०० मातीच्या झोपड्या पाडण्यात आल्या, अशी माहिती बंगाल प्रशासनाने दिली.

अपघात टाळण्यासाठी वीजपुरवठा आधीच बंद

बांगलादेशने अपघात टाळण्यासाठी काही भागांचा वीजपुरवठा आधीच बंद केला होता. तर, झाडे कोसळून वीजवाहिन्या तुटल्याने किनारपट्टीवरील अनेक शहरांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला, अशी माहिती ऊर्जा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. २७ मे रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोलकात्याच्या रस्त्यांवर पाणी साचले, अनेक भिंती कोसळल्या आणि किमान ५२ झाडे कोसळली. कोलकात्याने रविवारपासून ५० हून अधिक उड्डाणे रद्द केल्यानंतर विमानसेवा पुन्हा सुरू केली. उपनगरीय रेल्वे सेवाही पूर्ववत करण्यात आली.

मुसळधार पावसामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत

मुसळधार पाऊस आणि किनारी भागात पाण्याची पातळी वाढल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्याने भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांनी किमान १० लाख लोकांना मदत निवारा केंद्रात हलवले आहे. कोलकात्याने रविवारपासून ५० हून अधिक उड्डाणे रद्द केल्यानंतर विमानसेवा पुन्हा सुरू केली. उपनगरीय रेल्वे सेवाही पूर्ववत करण्यात आली.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर