Cyclone Remal Latest Updates: हवामान खात्याने म्हटले आहे की बंगालच्या उपसागरावर कमी दाबचा पट्टा तयार झाला असून आज रविवारी संध्याकाळपर्यंत रेमेल चक्री वादळात पश्चिम बंगाल आणि ओडीशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ ताशी ११०-१२० किलोमीटर वेगाने जमिनीवर धडकू शकते. तर ताशी १३५ किलोमीटरचा वेग हे चक्रीवाद गाठण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आज २६ आणि उद्या २७ मे रोजी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर ईशान्य भारताच्या काही भागांमध्येदेखील अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात अल आहे.
या वादळामुळे समुद्रात १.५ ते २ मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे किनारपट्टीवरील पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातील सखल भाग पाण्याखाली जाऊ शकतो. बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात २७ मेच्या सकाळपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान विभागाने आज २६ आणि २७ मे रोजी पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांसाठी (दक्षिण आणि उत्तर 24 परगणा) रेड अलर्ट जारी केला आहे. येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
आज सकाळी आयएमडीने जारी केलेल्या ताज्या हवामान माहितीनुसार, चक्रीवादळ 'रेमाल' येत्या ६ तासात तीव्र चक्री वादळात रूपांतरित होईल आणि २६ डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकेल. रविवारी मध्यरात्री ११० ते १२० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने सागर बेट आणि खेपुपारा येथे धडकेल.
नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सवधीगिरी म्हणून रविवारी दुपारपासून २१ तासांसाठी उड्डाणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बंदमुळे ३९४ उड्डाणे रद्द होणार आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या प्रवाशांची उड्डाणे रद्द झाली आहेत. त्यांना एअरलाइन्स पैसे परत करतील. विमानतळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "हवामान विभागाने ताशी ९३ -१११ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे लँडिंग आणि टेक ऑफमध्ये अडचणी येण्याची शक्यता असल्याने विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे.
पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ रेमलमुळे ताशी १३५ किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात आणि समुद्रात १.५ मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. याव्यतिरिक्त, केरळ आणि किनारी कर्नाटकात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीमुळे मालमत्तेचे नुकसान झाले.
सखल आणि संवेदनशील भाग आम्ही आधीच ओळखला आहे. सुरुवातीला सखल भागातून सुमारे आठ ते दहा हजार गावकऱ्यांचे स्थलांतर करण्याची आमची योजना आहे. काही जण शनिवारी रात्रीपर्यंत चक्रीवादळ निवारा केंद्रात स्थलांतरित होऊ शकतात, तर उर्वरित रविवारी आणले जातील, असे दक्षिण २४ परगण्याचे जिल्हाधिकारी सुमित गुप्ता यांनी सांगितले.
पश्चिम बंगालला दक्षिण २४ परगणा, उत्तर २४ परगणा आणि पूर्व मिदनापूर या तीन किनारी जिल्ह्यांमधून १५७ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. दक्षिण २४ परगणा जिल्ह्याला याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. आयएमडीने रविवारी दक्षिण २४ परगणा, उत्तर २४ परगणा, कोलकाता, हावडा आणि पूर्व मिदनापूर सारख्या काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
"सध्या पाच सागरी मार्गांवरील संवेदनशील भागातून सुमारे २५,००० लोकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागू शकते. रविवारी हे स्थलांतर करण्यात येणार आहे. नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असून अद्ययावत माहितीसाठी आम्ही आयएमडीच्या सतत संपर्कात आहोत, असे पूर्व मिदनापूरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. किनारपट्टीवरील जिल्ह्यांना ताशी १०० ते ११० किमी वेगाने वारे वाहतील आणि ताशी १२० किमी वेगाने वारे वाहतील. कोलकात्यात वाऱ्याचा वेग ताशी ९० किमी इतका होता.
दक्षिण २४ परगण्यात सुमारे ११५ बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्रे आहेत, तर उत्तर २४ परगण्यात अशी १०० हून अधिक निवारा केंद्रे आहेत. पूर्व मिदनापूरमध्ये समुद्राभिमुख पाच ब्लॉकमध्ये सुमारे ४३ केंद्रे आहेत जिथे लोकसंख्या सुमारे १५ लाख आहे.
बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्रे तयार ठेवण्यात आली असून, शाळा आणि इतर सरकारी इमारती निश्चित करण्यात आल्या आहेत, जिथे लोकांना स्थलांतरित केले जाऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य डायस्टर रिस्पॉन्स फोर्स (एसडीआरएफ) पथके तैनात करण्यात आली असून अन्न, पिण्याचे पाणी आणि औषधे यासारख्या मदत सामग्रीचा साठा करण्यात येत आहे. वादळाची माहिती लाऊडस्पीकरवर नागरिकांना दिली जात आहे. तसेच सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन देखील केले जात आहे.
संबंधित बातम्या