Cyclone Michaung :मिचॉन्गचा विध्वंस सुरुच! आंध्र प्रदेशात जाऊन धडकले वादळ; १४ नागरिक ठार
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Cyclone Michaung :मिचॉन्गचा विध्वंस सुरुच! आंध्र प्रदेशात जाऊन धडकले वादळ; १४ नागरिक ठार

Cyclone Michaung :मिचॉन्गचा विध्वंस सुरुच! आंध्र प्रदेशात जाऊन धडकले वादळ; १४ नागरिक ठार

Updated Dec 06, 2023 09:19 AM IST

Cyclone Michaung cyclone update : तामिळनाडू आंध्र प्रदेशात मिचॉन्ग चक्रीवादळाचा विध्वंस सुरूच आहे. आता पर्यन्त लाखो नागरिकांना या चक्री वादळाचा फटका बसला आहे. या वादळामुळे १४ जणांचा मृत्यू हत्यार ६१ हजार नागरिकांना मदत छावण्यांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.

Cyclone Michaung
Cyclone Michaung

Cyclone Michaung cyclone update : मिचॉन्ग चक्रीवादळाचा विध्वंस सुरूच आहे. हे वादळ आंध्र प्रदेशच्यादक्षिण किनारपट्टीवर धडकले असून आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीवर या वादळाने धुमाकूळ घातला आहे. या वादळामुळे दोन्ही राज्यातील अनेक जिल्हे प्रभावित झाले आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. तर झाडी आणि विजेचे खांब कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाली आहे. येथील अनेक रेल्वे गाड्या आणि विमाने रद्द करण्यात आले आहे. चेन्नईमधील तब्बल ९ जिल्ह्यातील ६१ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहेत. बचाव आणि मदत कार्य देखील सुरू करण्यात आले आहे.

Maharashtra Weather Update : ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळामुळे राज्यावर पावसाचे सावट; 'या' जिल्ह्यात बरसणार, पुण्यात थंडी वाढणार!

मिचॉन्ग चक्रीवादळ मंगळवारी तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश राज्याला धडकले. दुपारी हे वादळ जमिनीवर धडकल्याने मोठा विध्वंस झाला. चक्रीवादळामुळे सोसाट्याचा वारा आणि पाऊस झाला. यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली. सध्या हे वादळ तामिळनाडूतून आंध्रप्रदेशकडे सरकले आहे. या वादळाची तीव्रता कमी झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही तासात चक्रीवादळाची तीव्रता कमी होणार असून या वादळाचा विध्वंस कमी होईल.

दरम्यान, या वादळामुळे तब्बल १४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या वादळचा सर्वाधिक फटका हा चेन्नई, आंध्र प्रदेशातील काही जिल्ह्यांना बसला आहे. झाडे आणि वीज कोसळल्याने १४ नागरी ठार झाले आहे अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडूमध्ये २, आंध्र प्रदेशमध्ये ३, चेन्नईमध्ये ९ नागरिकांचा या वादळामुळे बळी गेला आहे. तर तामिळनाडू राज्यातील नऊ जिल्ह्यांतील ६१ हजार नगगरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान, आज या वादामुळे लंगणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच दक्षिण छत्तीसगड, दक्षिण किनारपट्टी आणि ओडिशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर