Delhi hit and run : दिल्लीत हीट अँड रन! भरधाव मर्सिडीजने सायकलस्वाराला चिरडले; जागीच मृत्यू, कार चालकाला अटक-cycle rider man killed in hit and run case by mercedes car in delhi ashram area ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Delhi hit and run : दिल्लीत हीट अँड रन! भरधाव मर्सिडीजने सायकलस्वाराला चिरडले; जागीच मृत्यू, कार चालकाला अटक

Delhi hit and run : दिल्लीत हीट अँड रन! भरधाव मर्सिडीजने सायकलस्वाराला चिरडले; जागीच मृत्यू, कार चालकाला अटक

Aug 18, 2024 11:45 AM IST

Delhi hit and run : राजधानी दिल्लीत हीट अँड रनची घटना उघडकीस आली आहे. एका भरधाव मर्सिडीजने सायकलस्वाराला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

दिल्लीत हीट अँड रण! भरधाव मर्सिडीजने सायकलस्वाराला चिरडले; जागीच मृत्यू, कार चालकाला अटक
दिल्लीत हीट अँड रण! भरधाव मर्सिडीजने सायकलस्वाराला चिरडले; जागीच मृत्यू, कार चालकाला अटक

Delhi hit and run : राजधानी दिली हीट अँड रनच्या घटनेने हादरली आहे. एका भरधाव मर्सिडीज कारने सायकलवरून जाणाऱ्या एका व्यक्तीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेनंतर कार चालक पळून गेला होता. पोलिसांनी त्याला कारसह ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली.

राजेश (वय ३४) असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना दिल्लीतील आश्रम परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेश हा शनिवारी सकाळी कामावर जात होता. यावेळी तो आश्रम परिसरातील भोगल उड्डाणपुलाजवळ आला असता एका भारधाव मर्सिडीजने त्याला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की तो या घटनेत गंभीर जखमी झाला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी तातडीने त्याला जवळील दवाखान्यात भरती केले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

 

पोलिसांनी आरोपीचे नाव जाहीर केलेले नाही. पोलिसांनी वाहन चालकाला व वाहन ताब्यात घेतले आहे. सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी भरधाव वेगात आलेल्या मर्सिडीजने आश्रमाजवळ सायकलस्वार राजेश नामक तरुणाला धडक दिली. या अपघातात राजेशचा जागीच मृत्यू झाला असून आरोपी कारसह पळून गेले. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत कार ताब्यात घेतली आणि चालकाला देखील अटक केली आहे.

मृत राजेश हा रायबरेलीचा रहिवासी

शनिवारी सकाळी पीडित राजेश कामावर जात असताना भोगल उड्डाणपुलाजवळ हा अपघात झाला. मागून भरधाव येणाऱ्या मर्सिडीज कारने त्याला धडक दिल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. राजेश हा मूळचा उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील असून त्याला दोन मुले आहेत. तो दक्षिण पूर्व दिल्लीतील जोरबाग भागात माळी म्हणून काम करत होता.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. राजेशचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच त्याचे कुटुंबीय शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. पोलिस पुढील कारवाई करत आहेत.

विभाग