Cyber Fraud: सायबर गुन्हेगारांनाच आता काढा वेड्यात; झटक्यात ओळखा फेक मेसेज आणि लिंक!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Cyber Fraud: सायबर गुन्हेगारांनाच आता काढा वेड्यात; झटक्यात ओळखा फेक मेसेज आणि लिंक!

Cyber Fraud: सायबर गुन्हेगारांनाच आता काढा वेड्यात; झटक्यात ओळखा फेक मेसेज आणि लिंक!

Updated Jul 30, 2024 04:29 PM IST

How to Identify Fake Messages and Links: खोटे मसेज आणि लिंक कशा ओळखायच्या? हे जाणून घेऊयात.

एका मिनिटांत ओळखा फेक मेसेज आणि लिंक
एका मिनिटांत ओळखा फेक मेसेज आणि लिंक

Cyber Crime: धावत्या- पळत्या जगात इंटरनेट हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. इंटरनेटमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहे. मात्र, इंटरनेटच्या वापरासह सायबर गुन्हेगारीत लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सायबर गुन्हेगार बक्षीस, नोकरी किंवा नागरिकांना घाबरून त्यांची फसवणूक करतात. अनेकदा सायबर गुन्हेगार नागरिकांना खोटी लिंक किंवा मेसेज पाठवून आपल्या जाळ्यात अडकवतात. मात्र, आता अशा अफवांना बळी न पडता मोबाईलवर येणारे खोटे मेसेज आणि लिंक कसे ओळखायचे? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

अलीकडेच पॉडकास्ट चॅनेलवरील एका प्रभावकाने फाइलमध्ये व्हायरस आहे की नाही, हे शोधण्याचा एक अतिशय आश्चर्यकारक मार्ग शोधला आहे. यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही आणि तुम्हाला कोणतेही ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही. वेबसाईटद्वारे तुम्ही काही मिनिटांत ते शोधू शकता.

व्हायरस टोटल, असे या वेबसाइटचे नाव आहे, जे काही मिनिटांतच बनावट मेसेजमध्ये येणाऱ्या लिंक्स शोधू शकतात. तसेच, या वेबसाइटद्वारे तुम्ही डाउनलोड केलेल्या कोणत्याही फाईलमध्ये उपस्थित असलेला व्हायरसदेखील शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त व्हायरस टोटल या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल आणि ज्या फाईलमध्ये व्हायरस असण्याची शक्यता वाटते, अशी फाइल अपलोड करावी लागेल. ही वेबसाइट फाइल्स स्कॅन करण्यासाठी ४० पेक्षा जास्त अँटीव्हायरस वापरते.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचं आमिष दाखवून १ कोटी २३ लाखांना गंडवलं

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून नवी मुंबईतील एका व्यक्तीची १ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दुबईतील ३४ वर्षीय व्यक्तीला नुकतीच अटक करण्यात आली. कौशिककुमार कल्याणभाई इटालिया असे या आरोपीचे नाव असून आहे. त्याच्याकडून सुमारे ४३ लाख ३१ हजार रुपये जप्त करण्यात पोलिसांना यश आले. नवी मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिस स्टेशनने इटालियाविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आणि २६ जून रोजी दुबईहून आल्यावर सुरत विमानतळावर त्याला अटक करण्यात आली.

वरिष्ठ निरीक्षक गजानन कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी नेरूळ येथील कंत्राटदार सतीश खुराणा (वय,५६) याला शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून १ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक केली. फसवणूक झाल्यानंतर खुराणा यांनी २१ नोव्हेंबर २०२३ रोजी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, ६ ऑगस्ट रोजी एका महिलेचा फोन आला होता की, तो एका आघाडीच्या बँकेचा प्रतिनिधी आहे. फोन करणाऱ्याने त्यांना त्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपची माहिती दिली जी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या टिप्स देते ज्यामुळे कमी कालावधीत मोठा परतावा मिळू शकतो.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर