Railway Ticket Frauds : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, तिकीटाच्या नावाखाली होतेय 'अशी' फसवणूक!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Railway Ticket Frauds : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, तिकीटाच्या नावाखाली होतेय 'अशी' फसवणूक!

Railway Ticket Frauds : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, तिकीटाच्या नावाखाली होतेय 'अशी' फसवणूक!

Jul 17, 2024 04:54 PM IST

IRCTC: नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार नवीन शक्कल लढवत आहे. अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारकडून सतत नागरिकांना सतर्क केले जाते.

सायबर गुन्हेगारीच्या संख्येत लक्षनीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सायबर गुन्हेगारीच्या संख्येत लक्षनीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Railway Tickets Refund Fraud: इंटरनेटच्या वाढत्या प्रभावासोबतच सायबर गुन्हेगारीचे प्रमाणातही प्रचंड वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. सायबर गुन्हेगार बक्षीस, नोकरी किंवा इतर गोष्टींचे आमिष दाखवून तसेच बँकेचे अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांची लूट करतात. एकीकडे नागरिक सायबर गुन्हेगारीबाबत सतर्क होत चालले आहेत. तसे सायबर गुन्हेगारही नागरिकांची लूट करण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत आहेत. याच पार्श्वभूमीवर सायबर गुन्हेगार आयआरसीटीसीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले. गृह मंत्रालयाच्या सायबर दोस्तने (CyberDost) प्रवाशांना अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. 

नुकतेच सायबर दोस्तने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून एक पोस्ट केली आहे. सायबर दोस्तने दिलेल्या माहितीनुसार, आयआरसीटीसीच्या तिकीट परताव्याच्या नावाखाली गुगल जाहिरातीचा वापर करून फसवणूक करणारे ही ऑनलाइन आर्थिक फसवणूक करत आहेत. भारतीय रेल्वे, आयआरसीटीसी किंवा त्यांचे कोणतेही कर्मचारी परताव्याशी संबंधित गोष्टींसाठी कोणत्याही वापरकर्त्याला कॉल करत नाहीत, असे सायबर दोस्तने म्हटले आहे. भारतीय रेल्वे, आयआरसीटीसी किंवा त्यांचे कोणतेही कर्मचारी वापरकर्त्याकडे डेबिट/क्रेडिट क्रमांक, ओटीपी, एटीएम पिन, सीव्हीव्ही किंवा पॅन क्रमांक यासारख्या वैयक्तिक बँकिंग तपशील विचारत नाहीत.


याशिवाय सायबर मित्राने असेही म्हटले आहे की, जर कोणी फोन करून तुमचे डिटेल्स विचारले किंवा मोबाइल, लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर एनीडेस्क किंवा टीम व्ह्यूअरसारखे रिमोट अ‍ॅप इन्स्टॉल करण्यास सांगितले तर त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. अशा कोणत्याही फसवणुकीची तक्रार तुम्ही १९३० या क्रमांकावर फोन करून नोंदवू शकता. तसेच कोणत्याही प्रकारचा सायबर क्राईम रिपोर्ट दाखल करण्यासाठी तुम्ही cybercrime.gov.in भेट देऊ शकतात. सायबर दोस्तचे लेटेस्ट अपडेट्स ताबडतोब मिळवण्यासाठी तुम्ही फेसबुक, इन्स्टाग्राम आणि एक्स सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील फॉलो करू शकता.

पुणे: पोलीस आयुक्तांचे बनावट अकाऊंट तयार करुन पैशांची मागणी

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा फोटो व्हॉट्सअप डिपीला ठेवून पैशांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे लक्षात येताच पोलीस आयुक्तांनीची अशा कोणत्याही मेसेजला प्रतिसाद न देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. सायबर चोरट्यांनी अनेकांना पैसे मागितल्याचेही समजत आहे. सायबर चोरट्यांनी अमितेश कुमार यांच्या ओखळीतील व्यक्तीला पाच दे दहा हजार रुपयांची मागणी केली. मी अमितेश कुमार असून विदेशात अडकलो आहे. विमान प्रवासासाठी मला पैसे हवे आहेत, असा मेसेज करून पैशांची मागणी सायबर गुन्हेगारांनी केली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर