CRPF Constable recruitment 2023 Result : केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) सीआरपीएफ कॉन्स्टेबल (Technical and Tradesman) २०२३ चा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार rect.crpf.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपले गुण तपासू शकतात.
या यादीनुसार भरतीच्या पुढील टप्प्यासाठी एकूण ६७ हजार ३९८ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. अर्जाचा क्रमांक, ट्रेडचं नाव, रोल नंबर, उमेदवाराचं नाव आणि राज्य निकालात नमूद करण्यात आलं आहे. पुढील निवड प्रक्रियेचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल. ही परीक्षा मागील वर्षी १ ते १२ जुलै दरम्यान पार पडली होती.
रिक्त पदांमध्ये चालक, मोटार मेकॅनिक वाहन, मोची, सुतार, शिंपी, ब्रास बँड, पाईप बँड, बगलर, माळी, पेंटर, कुक/वेटर वाहक आणि वॉशरमन अशा एकूण ९२१२ रिक्त पदांचा समावेश आहे. रिक्त पदांपैकी १०७ पदं महिलांसाठी आहेत तर उर्वरित ९१०५ पदं पुरुष उमेदवारांसाठी आहेत. - निवडलेल्या झालेल्या उमेदवारांना (रु. २१,७०० - ६९,१००) दरम्यान वेतन मिळेल.
> rect.crpf.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
> मुखपृष्ठावरील अधिसूचना विभाग शोधा.
> सीआरपीएफ परीक्षा २०२३ मधील कॉन्स्टेबल (टेक / ट्रेड्समन / पायनियर / मिनिट) च्या संगणक आधारित चाचणी (सीबीटी) चा निकाल" या लिंकवर क्लिक करा.
> शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची पीडीएफ पहा.
> पुढील कामासाठी छापील प्रत डाउनलोड करा आणि ठेवा.
पुरुषांसाठी…
चालक - ५४४
मोटर मेकॅनिक -
मोची- १५१
सुतार- १३९
टेलर- २४२
ब्रास बँड- १७२
पाईप बँड- ५१
बगलर- १३४०
माळी – ९२
पेंटर – ५६
कुक/WC- २४२९
वॉशरमन- ४०३
नाई- ३०३
सफाई कर्मचारी - ८११
महिलासाठी…
बगलर- २०
कुक/WC- ४६
वॉशरमन- ३
हेअर ड्रेसर - १
सफाई कर्मचारी - १३
ब्रास बँड - २४
पायोनियर विंग - ११
मेसन - ६
प्लंबर - १
इलेक्ट्रिशियन - ४