मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पंजाबमध्ये खालिस्तानी समर्थकांचा धुमाकूळ; लाठ्याकाठ्या अन् बंदुकांसह पोलीस ठाण्यावर केली चाल
waris de punjab chief amritpal singh
waris de punjab chief amritpal singh (HT)

पंजाबमध्ये खालिस्तानी समर्थकांचा धुमाकूळ; लाठ्याकाठ्या अन् बंदुकांसह पोलीस ठाण्यावर केली चाल

23 February 2023, 18:38 ISTAtik Sikandar Shaikh

Amritsar Punjab News : पोलिसांनी संघटनेच्या नेत्यावर कारवाई केल्यानंतर त्याच्या समर्थकांनी थेट पोलीस ठाण्यात धूडगूस घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

waris de punjab chief amritpal singh : खालिस्तानी चळवळीला पाठिंबा देणाऱ्या 'वारीस दे पंजाब' या संघटनेच्या नेत्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ खलिस्तानी समर्थकांनी पंजाबच्या अमृतसरमध्ये जोरदार राडा केला आहे. आरोपींच्या समर्थकांच्या जमावानं धारदार शस्त्र आणि बंदुका घेत पोलीस ठाण्याला घेराव घातला असून त्यानंतर पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आज दुपारपासून अमृतसरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यानंतर आता या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली असून लवकरच स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनानं प्रयत्न सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर एका तरुणानं पोस्ट केल्याप्रकरणी 'वारीस दे पंजाब' या संघटनेचा नेता अमृतपाल आणि त्याच्या समर्थकांनी तरुणाला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत अमृतपाल याच्यासह इतर आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांच्या अटकेची कार्यवाही सुरू केली होती. त्यानंतर संतापलेल्या अमृतपालने समर्थकांना पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलन करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर अमृतपालच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येनं अमृतपालचे समर्थक अमृतरसरमधील पोलीस ठाण्याबाहेर जमले. त्यानंतर अमृतपाल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आंदोलकांनी आक्षेपार्ह घोषणाबाजी करत धारदार शस्त्र आणि बंदुका हातात घेतल्या.

अमृतसर शहरातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी अमृतपालच्या समर्थकांवर लाठीचार्ज करत त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. याशिवाय पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या लोकांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रियाही पोलिसांनी सुरू केली आहे. पंजाबमधील खालिस्तानी चळवळीला पाठिंबा देणारी संघटना वारीस दे पंजाब ही संघटना नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिलेली आहे. याशिवाय संघटनेचा नेता अमृपालसिंग हा नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत असल्यामुळं त्याच्याविरोधात यापूर्वीदेखील पोलिसांनी अनेक गुन्हे दाखल केलेले आहेत.

विभाग