मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  'या' प्रजातीचे कुत्रे पाळणे धोकादायक! केंद्र सरकारने दिला राज्यांना बंदी घालण्याचा सल्ला

'या' प्रजातीचे कुत्रे पाळणे धोकादायक! केंद्र सरकारने दिला राज्यांना बंदी घालण्याचा सल्ला

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 14, 2024 09:44 AM IST

cross and mix breed dogs are danger for human : देशभरात कुत्र्यांच्या हल्ल्यात मोठी वाढ झाली आहे. या हल्ल्यात अनेकांचे प्राण देखील गेले आहे. पिटबुल, रॉटवेलर या सारख्या विदेशी प्रजाती धोकादायक असल्याने या सारख्या प्रजाती पाळण्यावर केंद्र सरकार बंदी घालण्याच्या तयारीत आहेत.

'या' प्रजातीचे कुत्रे पाळणे धोकादायक! सरकारने दिला बंदी घालण्याचा सल्ला
'या' प्रजातीचे कुत्रे पाळणे धोकादायक! सरकारने दिला बंदी घालण्याचा सल्ला

government recommends ban cross and mix breed dogs : अनेकांना कुत्री पाळण्याचा मोठा छंद असतो. घरात विविध प्रजातींची कुत्री पाळली जातात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून देशभरात कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. या हल्ल्यात अनेकांनी प्राण देखील गमावले आहेत. पाळीव कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक जखमी देखील झाले आहेत. पिटबुल, रॉटविलर या सारखी कुत्री ही धोकादायक असतात. कुत्र्यांचे हे हल्ले रोखण्यासाठी आता केंद्र सरकार मोठी पावले उचलण्याच्या तयारीत आहेत. कुत्र्यांच्या काही प्रजातींची आयात, प्रजनन व खरेदी यावर निर्बंध लादण्याच्या सूचना केंद्र सरकारनं राज्यांना केल्या आहेत. पिटबुल, रॉटविलर, टेरियर, वुल्फ डॉग आणि मॅस्टिफस अशा कुत्र्यांच्या प्रजातींचा यात समावेश करण्यात आला आहे.

जगात मोठ्या प्रमाणात श्वान प्रेमी आहेत. या श्वान प्रेमींकडून विविध जातीची कुत्री पाळली जातात. भारतात देखील या प्रकरची कुत्री पाळली जातात. काही वेळा तर परदेशी जातींची कुत्री ही आयात देखील केली जाते. मात्र, यातील काही प्रजाती या हिंस्त्र असल्याने त्यांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी आणि मृत्यूमुखी देखील पडले आहेत. काही दिवसांपूर्वी लखनौमध्ये एका वृद्ध महिलेचा घरातील कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. पाळीव पिटबुलने या महिलेला चावा घेतला होता. या घटना वाढत असल्यामुळे सरकारने या मुद्द्यावर मोठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार पिटबुल, रॉटवेलर, टेरियर, वुल्फ डॉग, मास्टिफ या परदेशी जातीच्या कुत्र्यांच्या आयात, प्रजनन आणि विक्रीवर बंदी घालावी, अशी सूचना केंद्र सरकारने राज्यांना केली आहे.

एक्स्ट्रा सांबर देण्यास नकार दिल्याने बाप लेकाने केली रेस्टॉरंट मालकाची हत्या

एका समितीच्या शिफारशींच्या आधारे केंद्र सरकारने हा सल्ला दिला आहे. काही परदेशी जातींची कुत्री ही धोकादायक आहे. या कुत्र्यांशिवाय इतर मिश्र आणि संकरित कुत्र्यांवरही बंदी घालावी, असे केंद्राचे मत आहे. राज्यांना लिहिलेल्या पत्रात, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना संकरित आणि परदेशी जातीच्या कुत्र्यांना पाळण्याचे परवाने देऊ नयेत असे आवाहन केले आहे. या कुत्र्यांच्या विक्रीवर आणि प्रजननावरही बंदी घालावी, अशा सूचना देखील करण्यात आल्या आहेत.

Mumbai High court : ॲट्रॉसिटींतर्गत दाखल गुन्हे, खटल्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग बंधनकारक; मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, प्राणी कल्याण संस्था आणि तज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. या बाबत काही परदेशी प्रजातींवर निर्बंध घालण्याच्या सूचना कोर्टने सरकारला केल्या होत्या. त्यामुळे नव्या नियमानुसार नागरिकांना आधीच पाळलेल्या काही विदेशी प्रजातीच्या कुत्र्यांची नसबंदी करावी लागणार असल्याचे विभागाचे म्हणणे आहे.

या प्रजातीच्या कुत्र्यांवर बंदी घालण्याची शिफारस

सरकारने क्रॉस, मिश्र आणि परदेशी जातीच्या कुत्र्यांवर बंदी घालण्याची शिफारस करण्यात आली आहे. या यादीत पिटबुल टेरियर, तोसा इनू, अमेरिकन स्टॅफोर्डशायर टेरियर, डोगो अर्जेंटिनो, अमेरिकन बुलडॉग, बोस्बोएल, कंगल, सेंट्रल एशियन शेफर्ड, कॉकेशियन शेफर्ड, साउथ रशियन शेफर्ड डॉग, टोनजॅक, सारप्लानिनाक, जपानी टोसा आणि अकिता, मास्टिफ्स, रॉटलवेअर, टेरियर, रोडेशियन रिजबॅक, वोल्फ डॉग्स, कनारियो, अकबाश, मॉस्को गार्ड, केन कार्सी.

WhatsApp channel