RSS ही राष्ट्रसेवेत गुंतलेली संघटना, तिच्या विरोधात बोलणं संविधान विरोधी; उपराष्ट्रपतींच्या विधानानं गदारोळ
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  RSS ही राष्ट्रसेवेत गुंतलेली संघटना, तिच्या विरोधात बोलणं संविधान विरोधी; उपराष्ट्रपतींच्या विधानानं गदारोळ

RSS ही राष्ट्रसेवेत गुंतलेली संघटना, तिच्या विरोधात बोलणं संविधान विरोधी; उपराष्ट्रपतींच्या विधानानं गदारोळ

Updated Jul 31, 2024 05:02 PM IST

Jagdeep Dhankhar on RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करून या संघटनेला एकाकी पाडण्याचा प्रयत्न करणं हे राज्यघटनेच्या विरोधी आहे, असं राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे.

आरएसएस ही राष्ट्रसेवेत गुंतलेली संघटना, तिच्या विरोधात बोलणं संविधानविरोधी; उपराष्ट्रपतींच्या विधानानं वाद
आरएसएस ही राष्ट्रसेवेत गुंतलेली संघटना, तिच्या विरोधात बोलणं संविधानविरोधी; उपराष्ट्रपतींच्या विधानानं वाद

Jagdeep Dhankhar : 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ही देशाच्या सेवेत गुंतलेली संघटना आहे. संघाचे लोक नि:स्वार्थपणे काम करत असतात. राष्ट्रसेवेत गुंतलेल्या अशा संघटनेवर टीका करणं हे संविधानाच्या विरोधात आहे, असं वक्तव्य राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी आज केलं. त्यांच्या या विधानामुळं सभागृहात गदारोळ झाला व विरोधी पक्षांनी सभात्याग केला.

एनटीए (National Testing Agency) अध्यक्षांच्या नियुक्तीवर बोलताना समाजवादी पक्षाचे खासदार रामजी सुमन यांनी केलेल्या टिप्पणीमुळं अध्यक्ष जगदीप धनखड संतापले होते. धनखड हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याच्या खासदाराच्या विधानावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. हे वक्तव्य संसदेच्या रेकॉर्डवर येऊ देणार नाही, असं ते म्हणाले. 'आरएसएसची विश्वासार्हता वादातीत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एकाकी पाडण्याचं षडयंत्र कुणालाही करू देणार नाही, असं ते म्हणाले.

मल्लिकार्जुन खर्गे यांचा आक्षेप

विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी जगदीप धनखड यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. जोपर्यंत एखादा सदस्य संसदीय कामकाजाच्या नियमांचं उल्लंघन करत नाही, तोपर्यंत सभापती कोणत्याही सदस्याच्या वक्तव्याला आक्षेप घेऊ शकत नाहीत, असं खर्गे म्हणाले.

RSS ला देशाच्या विकासयात्रेत सहभागी होण्याचा अधिकार

संसदेच्या सदस्यानं नियमांचं उल्लंघन केलं तरच सभापती हस्तक्षेप करू शकतात, हे मला मान्य आहे, परंतु इथं खासदार थेट भारतीय संविधानाच्या विरोधात बोलत आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एकाकी पाडण्याचा प्रयत्न करत आहे. हे संविधानाचं उल्लंघन आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना राष्ट्रीय कल्याणासाठी काम करत आहे. संस्कृतीसाठी योगदान देत आहे, ही आनंदाची बाब आहे आणि असं काम करणाऱ्या कोणत्याही संघटनेचा प्रत्येकानं अभिमान बाळगला पाहिजे, असं धनखड म्हणाले. धनखड यांच्या या वक्तव्यानंतर बहुजन समाज पक्ष व बिजू जनता दलासह सर्व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला.

का सुरू झाला वाद?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवरील बंदी उठवण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशानंतर राज्यसभेत विरोधी पक्ष आणि भाजपमध्ये राजकीय वाद सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वैचारिक आधारावर कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडायची आहे, असा आरोप काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर