wife killing husband : राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यात (Hanumangarh) एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. येथील भादरा विधानसभा मतदारसंघातील गोगामेडीजवळील खचवाना गावात एका पत्नीने आपल्या पत्नीची हत्या करून मृतदेह घरातील टॉयलेटमध्ये दफन केला. हा प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ माजली आहे. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली व पंचनामा करत तपास सुरू केली.
खचवाना गावातील ४२ वर्षीय रूपराम आपल्या घरातून १६ दिवसापासून बेपत्ता होता. त्याच्या कुटूंबीयांनी याची पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यानंतर कुटूंबीयांना स्थानिक आमदारांची भेट घेतल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी रूपराम यांच्या पत्नीची चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकरण समोर आले. रूपरामच्या पत्नीने आपला गुन्हा कबूल केला आहे.
पोलिसांनी कुटूंबाच्या सांगण्यावरून घरात बनवलेल्या टॉयलेटमध्ये खुदाई केली. त्यात रूपरामचा मृतदेह आढळला. यादरम्यान, एफएसएल पथकाने पुरावे गोळा केले. रूपरामच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, अनेक वेळा पोलिसांकडे धाव घेऊनही गुन्हा नोंदवला नाही. त्यांनी आधीच संशय व्यक्त केला होता की, रूपरामची पत्नीच पतीची हत्या करू शकते. मात्र पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही.
या प्रकरणी पोलीस अधीक्षक विकास सांगवान यांनी सांगितले की, ही हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचा अंदाज आहे. पोलीस सर्व शक्यता गृहित धरून या प्रकरणाचा तपास करत आहे. याबाबत मृत रूपरामच्या पत्नीची चौकशी केली आहे. यामध्ये आणखी काही आरोपींचा समावेश होऊ शकतो. याचा तपास केला जात आहे. अन्य कोणाचा सहभाग आढळल्यास त्यांनाही अटक केली जाईल. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
या प्रकरणी ग्रामस्थ व नातेवाईक आक्रमक झाले आहेत. त्यांनी रस्ता रोको करत पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली. नातेवाईकांनी मागणी केली आहे की, गोगामेडी पोलीस ठाण्याचे अधिकारी अजय गिरधर यांना सस्पेंड केले जावे व अन्य आरोपींना तत्काळ अटक करावी.