Crime At Government School : तामिळनाडूच्या तंजावर येथील मल्लीपट्टणम सरकारी शाळेत २६ वर्षीय शिक्षिकेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संशयित ३० वर्षीय मदनने आपल्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार मिळाल्यानंतर शिक्षिकेवर हल्ला केला. हल्ल्यानंतर शिक्षिकेच्या मानेवर गंभीर जखम झाल्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संशयित मदनला अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे. एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, हल्ला वैयक्तिक हेतूने करण्यात आला होता. रमाणी आणि मदन यांच्यात काही दिवसांपूर्वी विवाहाच्या संदर्भात चर्चा झाली होती, पण रमाणीने त्याच्या प्रस्तावाला नकार दिला होता. या नकारामुळे नाराज झालेल्या मदनने शाळेत जाऊन शिक्षिका असलेल्या रमाणीवर धारदार शस्त्राने हल्ला केला.
सदर घटना घडली तेव्हा रमाणी शाळेत आपल्या कामात व्यस्त होती. यावेळी मदन तिच्याजवळ आला. त्याने अचानक तिच्यावर हल्ला करून मानेवर सपासप वार केले. यामुळे ती गंभीर जखम केली. हल्ल्याच्या वेळी मदनच्या मनातील नाराजी आणि निराशा स्पष्ट दिसून आली, त्याच्या मनात प्रचंड राग होता. या रागातूनच त्याने रमाणी जीव घेतला. या हल्ल्यानंतर रमाणीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण तिचा जीव वाचवता आला नाही.
शालेय शिक्षण मंत्री अनबिल महेश पोयामीझी यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी तंजावरमधील त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याचे निर्देश दिले असून, हल्ल्याच्या घटनेवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. मंत्री पोयामीझी यांनी घटनेवर शोक व्यक्त करत, शोकग्रस्त कुटुंब आणि विद्यार्थ्यांबद्दल आपली सहानुभूती व्यक्त केली आहे.
शाळेच्या आवारात शिक्षिकेवर झालेला हल्ला अत्यंत दुर्दैवी असून, शिक्षिकेवर झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला जात आहे. सरकारकडून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. रमाणीच्या कुटुंबाला या घटनेमुळे धक्का बसला असून, मुलीच्या मृत्यूमुळे त्यांचे जीवन कोलमडून गेले आहे. हा प्रकार तामिळनाडूतील शालेय शिक्षण व्यवस्थेसाठी एक मोठा धक्का आहे, आणि विद्यार्थ्यांमध्ये शाळेतील सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे. शिक्षिका रमाणीने आपल्या कामात असलेल्या समर्पणाने आणि शिकवणीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचे जीवन बदलले होते. तिच्या मृत्यूने शाळेतील इतर सहकारी देखील शोकसागरात बुडाले आहेत.