माहेरी पाठवण्यास नकार, पोलीस कॉन्स्टेबल पत्नीने पाचव्या मजल्यावरून मारली उडी; नातेवाईकांचा हत्येचा आरोप
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  माहेरी पाठवण्यास नकार, पोलीस कॉन्स्टेबल पत्नीने पाचव्या मजल्यावरून मारली उडी; नातेवाईकांचा हत्येचा आरोप

माहेरी पाठवण्यास नकार, पोलीस कॉन्स्टेबल पत्नीने पाचव्या मजल्यावरून मारली उडी; नातेवाईकांचा हत्येचा आरोप

Jan 25, 2025 12:50 AM IST

पती दिलीपने आरतीला मारहाण करून बाल्कनीतून फेकून तिची हत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. दिलीप रोज हुंड्याची मागणी करत तिचा शारीरिक व मानसिक छळ करत असल्याचा आरोप पत्नीच्या नातेवाईकांनी केला आहे.

मृतदेह
मृतदेह (iStock)

Police Constable wife Suicide :  मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका पोलीस कॉन्स्टेबलच्या पत्नीचा पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. पतीचे म्हणणे आहे की,  तिला तिच्या माहेरच्या घरी नेण्यास नकार दिला, ज्यामुळे तिने रागाच्या भरात पाचव्या मजल्यावरून उडी मारली.  तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव आरती आहे. आरतीने छतावरून उडी मारल्याचे मृत महिलेच्या पतीने पोलिसांना सांगितले. माहेरच्या घरी जाण्यास नकार दिल्याने ती संतापली होती. मात्र, महिलेच्या कुटुंबीयांचा दावा वेगळाच आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मृत आरती राठोड ग्वाल्हेरमधील सागर ताल येथील सरकारी कॉटर्रमध्ये रहात होती. आरतीचे पती दिलीप राठोड हे थाटीपूर पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल (Police Constable) आहेत. गुरुवारी रात्री आरती घराच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडली, त्यानंतर तिला उपचारासाठी जेएच रुग्णालयात दाखल करण्यात आले असता रात्री उशिरा उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

काय आहे कुटुंबाचा आरोप?

पती दिलीपने आरतीला मारहाण करून बाल्कनीतून फेकून तिची हत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. दिलीप दररोज हुंड्याची मागणी करत होता आणि हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने त्याने हे पाऊल उचलले. घटनास्थळी रक्ताचे डाग दिसले आहेत. तसेच शेजाऱ्यांनीही तिला मारहाण झाल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी महिलेने इमारतीवरून उडी मारल्याची माहिती पोलिसांना मिळताच पथक तपासासाठी घटनास्थळी पोहोचले. येथे हवालदार दिलीप राठोड यांच्या फ्लॅटला कुलूप लागलेले आढळले. त्यानंतर तिचा पती आणि मुले रुग्णालयात दाखल झाली.

आरती आणि दिलीप यांचा विवाह २०१७ मध्ये भिंड जिल्ह्यात झाला होता. त्यांना ६ वर्षांची मुलगी निधी आणि २ वर्षांचा मुलगा विहान आहे. याबाबत अधिक माहिती देताना अप्पर पोलिस अधीक्षक निरंजन शर्मा यांनी सांगितले की, थाटीपूर पोलिस ठाण्यात हवालदार असलेल्या दिलीप राठोड यांचा आरती राठोड याच्याशी विवाह झाला होता. आरतीच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबीय आणि इतर लोकांचे ही जबाब घेतले जात आहेत. तपासानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.

 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर