OMG! घरात एकाच कुटूंबातील ५ लोकांचे सांगाडे आढळल्याने खळबळ, २०१९ पासून बंद होता दरवाजा-crime news five family members skeletal found in home at chitradurga karnataka ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  OMG! घरात एकाच कुटूंबातील ५ लोकांचे सांगाडे आढळल्याने खळबळ, २०१९ पासून बंद होता दरवाजा

OMG! घरात एकाच कुटूंबातील ५ लोकांचे सांगाडे आढळल्याने खळबळ, २०१९ पासून बंद होता दरवाजा

Dec 29, 2023 11:48 PM IST

Five skeletons found in a house : चित्रदुर्गातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका घरातून पाच मानवी सांगाडे आढळले आहेत. हे सर्वजण एकाच कुटुंबातील असण्याची शक्यता पोलिसांना आहे.

Five skeletons found in a house
Five skeletons found in a house

एका घरातून पाच मानवी सांगाडे मिळाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. हे सगळे सांगाडे एकाच कुटुंबातल्या सदस्यांचे आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हा प्रकार कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग जिल्ह्यात समोर आला आहे.

एका बंद घरात एकाच कुटूंबातील पाच लोकांचे सांगाडे मिळाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, त्यांना संशय आहे की, हे सांगाडे सेवानिवृत सरकारी अभियंते जगन्नाथ रेड्डी (७०), त्यांची पत्नी प्रेमावती (६५), मुलगी त्रिवेणी,  मुलगा कृष्णा आणि  नरेंद्र यांचे असू शकतात. पोलिसांनी सांगितले की, फॉरेंसिक रिपोर्टनंतरच मृतांची ओळख पटू शकते. पोलिसांनी सांगितले की, हे कुटूंब लोकांमध्ये जास्त मिसळत नव्हते व त्यांना गंभीर आजार होते. 

शेवटचे २०१९ मध्ये दिसले होते -
या कुटूंबाला शेवटचे २०१९ मध्ये पाहिले गेले होते. तेव्हापासून त्यांचे घर बंद होते. पोलिसांना एका स्थानिक माध्यम प्रतिनिधीकडून याची माहिती मिळाली. पोलिसांनी सांगितले की, आम्ही गुरुवारी घटनास्थळी गेलो व कुटूंबाच्या नातेवाईकांशी व मित्रपरिवाराशी बातचीत केली. सर्वांनी सांगितले की, हे कुटूंब एकांतवासात रहात होते. त्यांना गंभीर आजार होते. 

कसे पोहोचले पोलीस ?

विशेष म्हणजे या कुटूंबाला शेवटचे जुलै २०१९ मध्ये पाहिले गेले होते. त्यानंतर त्यांचे घर पूर्णपणे बंद होते. या कुटूंबातील कोणाताही व्यक्ती कोणाच्या दृष्टीस पडला ना त्यांची काही माहिती मिळाली. दोन महिन्यापूर्वी सकाळी फिरायला गेलेल्या स्थानिक लोकांना घराचा मुख्य दरवाजा तुटल्याचे दुसून आले. मात्र त्यानंतही पोलिसांना सूचना देण्यात आली नाही. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर समजले की, घराच्या आतमध्ये अनेकवेळा तोडफोड केल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले.

पोलिसांनी सांगितले की, घरातील एका खोलीत चार सांगाडे झोपलेल्या अवस्थेत (दोन बेडवर दोन जमिनीवर) आढळले तर एक सांगाडा दुसऱ्या खोलीत झोपलेल्या अवस्थेत आढळला.

कोणीही पुरावे मिटवू नयेत यासाठी घटनास्थळाला सील करण्यात आले आहे. मृत्यूचे कारण अजूनही समोर आलेले नाही. ही सामूहिक आत्महत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच अन्यही कारण असून शकते. फॉरेंसिक रिपोर्ट व मृतदेहांच्या परीक्षणानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल. हे घर कोणाचे आहे व येथे कोण लोक रहात होते, याची माहितीही मिळवली जात आहे. 

विभाग