मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  दार्जिलिंगच्या तरुणीवर दिल्लीत ७ दिवस बलात्कार, मारहाण करून उकळती डाळ अंगावर फेकली

दार्जिलिंगच्या तरुणीवर दिल्लीत ७ दिवस बलात्कार, मारहाण करून उकळती डाळ अंगावर फेकली

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 07, 2024 05:01 PM IST

Delhi Crime : नोकरीसाठी दिल्लीत आलेल्या दार्जिलिंगच्या तरुणीवर सात दिवस लैंगिक अत्याचार करून तिच्यावर उकळलेल्या डाळीचे भांडे फेकल्याचा प्रकार समोर आला आहे.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

राजधानी दिल्ली पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेने हादरली आहे. नराधमाने पश्चिम बंगालमधील  दार्जिलिंग येथे राहणाऱ्या एका तरुणीवर सात दिवस अत्याचार केला. त्यानंतर तिला बेदम मारहाण करून तिच्या अंगावर उकळलेल्या डाळीचे भांडे फेकले. यात तरुणी २० टक्केहून अधिक जळाली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने तरुणीला नोकरी देण्याचे तसेच लग्न करून सोबत राहण्याचे आमिष दाखवले होते. ही घटना ३० जानेवारी रोजी उघडकीस आली होती.

पोलिस नियंत्रण कक्षात फोन करून माहिती देण्यात आली होती की, एका व्यक्तीने आपल्या पत्नीला मारहाण केली आहे. पोलिसांनी सांगितले की, जेव्हा तरुणीने नोकरी न मिळाल्याने तरुणीने लग्नास नकार दिला. यानंतर आरोपीने तिला बेदम मारहाण करून तिच्या अंगावर उकळलेल्या डाळीचे भांडे फेकले. यामध्ये तिचा चेहरा व हात गंभीररित्या भाजला आहे. दाल फेंक दी, जिससे उसका चेहरा और हाथ गंभीर रूप से जल गए। आरोपीचे नाव पारस असून तो उत्तराखंडचा रहिवासी आहे.

३-४ महिन्यापूर्वीच झाली होती ओळख -  

आरोपीने तरुणीला एका खोलीत कोंडून ठेवले होते. पोलिसांनी तिला खोलीतून बाहेर काढत एम्स रुग्णालयात दाखल केले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, चौकशीत समोर आले आहे की, तरुणी दार्जिलिंगमधील राहणारी आहे. ती मागील ३ ते ४ महिन्यापूर्वी मोबाइल फोनच्या माध्यमातून आरोपी पारसच्या संपर्कात आली व त्यांच्यात मैत्री झाली. त्यांनी लग्न केलेले नाही. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ती नोकरीसाठी रेल्वेने दिल्ली मार्गे बेंगळुरूला जाणार होती. दिल्लीत ती एक दिवसासाठी थांबली होती. 

जेव्हा ती दिल्लीत आली तेव्हा पारसने तिला आपल्यासोबत राहण्यास सांगितले. तसेच दिल्लीत नोकरी लावण्याचे आश्वासन दिले. त्याच्यावर विश्वास ठेऊन ती त्याच्यासोबत राजू पार्क मध्ये भाड्याच्या घरात राहू लागली. त्यानंतर तरुणीने आरोप केला की, काही दिवसानंतर त्याने तिला मारहाण करायला सुरूवात केली. मागील एक आठवड्यापासून त्याने तिचे लैंगिक शोषण करू लागला. एकदा त्याने तिच्या शरीरावर गरम डाळ टाकली. 

पोलिसांनी सांगितले की, भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ३२३, ३७६ (बलात्कार), आणि ३७७ (अनैसर्गिक लैंगिक अत्याचार) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

WhatsApp channel

विभाग