मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  NDA ला बहुमत मिळताच भाजप कार्यकर्त्याने स्वत:च्या हाताची बोटं कापली अन् केली देवीला अर्पण

NDA ला बहुमत मिळताच भाजप कार्यकर्त्याने स्वत:च्या हाताची बोटं कापली अन् केली देवीला अर्पण

Jun 08, 2024 07:28 PM IST

Chhattisgarh News : दुर्गेशने आपल्या हाताची बोटं कापून देवीची पूजाही केली. त्यानंतर कापलेले बोट घेऊन रुग्णालयात पोहोचला. त्याच्यावर उपचार केला गेला.

भाजप कार्यकर्त्याने  स्वत:च्या हाताची बोटं कापली.
भाजप कार्यकर्त्याने  स्वत:च्या हाताची बोटं कापली.

bjp worker chopped his finger : लोकसभा निवडणुकीचे निकाल सर्वांच्या समोर आहेत.  NDA ने २९३ जागांवर विजय मिळवून तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे.  ९  जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. निवडणुकीच्या निकालाबाबत अनेक पैजा व शर्त लावल्या जातात. काही लोक देवालाही असे काही नवस बोलतात की, थक्क करतात. छत्तीसगडमध्येही असाच प्रकार समोर आला आहे. येथे एका तरुणाने निवडणुकीतील हार-जीतवर आपली बोटं कापून देवीला अर्पण केली आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

इंडिया आघाडी व एनडीएमध्ये विजयाचा पारडं दोलायमान होतं. मात्र सायंकाळपर्यंत लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्याचे स्पष्ट होताच छत्तीसगडमधील भाजपाच्या कार्यकर्त्याने गावातील काली मातेच्या मंदिरात जाऊन स्वत:ची बोटं दान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दुर्गेश पांडे (३०) असं या भाजपा कार्यकर्त्याचं नाव आहे. ४ जून रोजी सायंकळाच्या सुमारास छत्तीसगडच्या बलरामपूरमध्ये ही घटना घडली आहे. 

बलरामपुर जिल्ह्यातील डीपाडीह गावात राहणाऱ्या दुर्गेश पांडे या तरुणाने उजव्या हाताची करंगळी कापून मंदिरात जाऊन देवीला अर्पण केली. हाताचे बोट का कापले, या प्रश्नावर त्याने सांगितले की, त्याची इच्छा होती की, भाजपचे तिसऱ्यांदा सरकार स्थापन व्हावे. ही इच्छा पूर्ण होताच त्याने आपल्या हाताची बोटं कापून देवीला अर्पण केली व भाजपसाठी नवस बोलला. 

दुर्गेशने आपल्या हाताची बोटं कापून देवीची पूजाही केली. त्यानंतर कापलेले बोट घेऊन रुग्णालयात पोहोचला. त्याच्यावर उपचार केला गेला. डॉक्टरांनी सांगितले की, कापलेले करंगळी जोडली जाऊ शकत नाही मात्र त्याच्यावर उपचार केले जाऊ शकतात. त्याला पुढील उपचारासाठी अंबिकापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गेशची प्रकृती सध्या ठीक आहे.

दुर्गेश पांडे ४ जून रोजी निकाल जाहीर होण्याआधी ३ जून रोजी सामंत सरना येथे एकटे गेले होते. तेथे त्याने काली मातेची पूजा केली. दुर्गेशने सांगितले की, लोकांची या मंदिरावर खूप श्रद्धा आहे. येथे लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. यामुळे मी सुद्धा येथे नवस बोलला होता. आणि माझी इच्छा पूर्ण झाली. जर भाजपने ४०० चा आकडा पार केला असता तर मला आणखी आनंद झाला असता.

टी-२० वर्ल्डकप २०२४