फरिदाबादमधील मोकाट जनावरांची समस्या आता रस्त्यावरून बेडरूमपर्यंत पोहोचली आहे. फरिदाबादमधील डबुआ कॉलनीतील सी ब्लॉकमधील एका घराच्या बेडरूममध्ये बुधवारी गाय आणि बैल घुसले. यामुळे खोलीत उपस्थित असलेल्या एका महिलेच्या जीवाला धोका निर्माण झाला. जीव वाचवण्यासाठी महिलने तब्बल २ तास स्वत:ला कपाटात बंद करून ठेवले.
माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेत कुत्र्याच्या मदतीने दोन्ही जनावरांना पळवून लावले. या घटनेनंतर रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांबाबत स्थानिकांनी संताप व्यक्त केला. मिळालेल्या माहितीनुसार, राकेश साहू हे कुटुंबासह सी-ब्लॉकमध्ये राहतात. त्यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास त्याची पत्नी सपना पूजा करत होती.
माझी आई किराणा सामान घेण्यासाठी दुकानात गेली होती. मुले मावशीच्या घरी भेटायला गेली होती. यावेळी एक गाय थेट त्यांच्या बेडरूममध्ये घुसली. घरच्यांना काही समजण्याआधीच एक बैलही गायीच्या पाठोपाठ बेडरूममध्ये शिरला. इतकंच नाही तर बैल पलंगावर चढला. दुसरीकडे त्याची पत्नी सपना पूजा करत होती, खोलीत दोन जनावरे दिसताच तिला धक्का बसला. घाबरून तिने कपाटात लपून स्वत:ला त्यात बंद केले. तिने आरडाओरडा केल्यावर लोक जमा झाले.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या लोकांना तब्बल दोन तास मेहनत घ्यावी लागली. तेथे उपस्थित लोकांनी फटाके फोडले, जनावरांवर पाणी फेकले, त्यांना काठ्याने धमकावले आणि आवाजही केला पण त्याचा जनावरांवर काहीही परिणाम झाला नाही. दोन्ही जनावरे खोलीतून हलली नाहीत, पण दोघेही पलंगाच्या वर चढले. त्यानंतर शेजाऱ्याने आपला पाळीव कुत्रा आणला. जनावरे पाहून कुत्रा भुंकायला लागला. या भीतीपोटी दोन्ही जनावरे एक-एक करून खोलीतून बाहेर आली. तब्बल दोन तास कपाटात बंद असलेली ही महिला श्वास रोखून धरत होती. जनावरे बाहेर गेल्यानंतर महिलेलाही डॉक्टरांकडे नेण्यात आले.
स्मार्ट सिटीमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढत आहे. दररोज अपघात होत असतात. गेल्या वर्षी भारत कॉलनीत एका प्रॉपर्टी डीलरचा जनावराच्या धडकेत मृत्यू झाला होता. रस्त्यावरील अंधारात तरुणाला प्राणी दिसला नाही आणि त्याच्या दुचाकीची धडक झाली. या प्रकरणी मृताच्या कुटुंबीयांनी खेरीपूल पोलिस ठाण्यात महापालिकेविरोधात गुन्हाही दाखल केला होता.
संबंधित बातम्या