मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Covid vaccine : कोरोना लसीकरणामुळे भारतातील ३४ लाख लोकांचा जीव वाचला!

Covid vaccine : कोरोना लसीकरणामुळे भारतातील ३४ लाख लोकांचा जीव वाचला!

Feb 26, 2023 05:16 PM IST

Covid vaccine : कोरोना लसीकरणाद्वारे भारताने महामारीच्या काळात ३.४ दशलक्ष लोकांचे प्राण वाचविण्यात यश मिळवले आहे, असा अहवाल अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने प्रसिद्ध केला आहे.

Covid vaccine
Covid vaccine

अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने सांगितले की, कोरोना लसीकरणाद्वारे भारताने महामारीच्या काळात ३.४ दशलक्ष लोकांचे प्राण वाचविण्यात यश मिळवले आहे. यासोबतच देशाला १८.३ अब्ज डॉलर्सच्या नुकसानीपासूनही वाचवले आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या वर्किंग पेपरमध्ये ही बाब समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी याचे प्रकाशन केले.

या पेपरमध्ये कोरोना, नियंत्रण, मदत पॅकेज आणि लसीकरणाबाबत भारताच्या रणनीतीच्या तीन कोनशिलांचा आढावा घेण्यात आला आहे. जीव वाचवण्यासाठी आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी, उपजीविका राखण्यासाठी आणि विषाणूविरूद्ध प्रतिकारशक्ती विकसित करून आर्थिक क्रियाकलाप सुनिश्चित करण्यासाठी हे तीन उपाय महत्त्वपूर्ण होते. लसीकरण मोहिमेचा कमी खर्च हा देखील एक महत्त्वाचा घटक असल्याचे वर्किग पत्रात म्हटले आहे. यामुळे देशाला १५.४२ अब्ज डॉलरचा फायदा झाला. 

अहवालात असे दिसून आले आहे की लसीकरणाचे फायदे त्याच्या खर्चापेक्षा जास्त आहेत. लसीकरणाद्वारे कार्यरत वयाच्या लोकसंख्येमध्ये वाचलेली आजीवन कमाई अंदाजे $२१.५ अब्ज इतकी आहे. अहवालात असे म्हटले आहे की कोवॅक्सिन आणि कोविशील्ड लसींनी केवळ प्राणघातक विषाणूशी लढण्यात मदत केली नाही तर लसीकरणाद्वारे आरोग्य यंत्रणेवरील भार कमी केला.

ट्रेंडिंग न्यूज

८० कोटी लोकांना मोफत जेवण -

अहवालानुसार, कोणीही उपाशी झोपणार नाही याची खात्री करण्यावर सरकारने लक्ष केंद्रित केले.या अंतर्गत, ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य वितरीत केले गेले ज्यामुळे ज्यावर २६.२४  अब्ज डॉलर्सचा परिणाम झाला. याशिवाय पीएम गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू केल्याने स्थलांतरित कामगारांना तात्काळ रोजगार आणि उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देण्यात मदत झाली. योजनेद्वारे ४० लाख लाभार्थ्यांना रोजगार प्रदान करण्यात आला.

WhatsApp channel
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर