मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  देशात कोरोनाचा उद्रेक, २४ तासात नव्या रुग्णसंख्येत ४५ टक्क्यांची वाढ

देशात कोरोनाचा उद्रेक, २४ तासात नव्या रुग्णसंख्येत ४५ टक्क्यांची वाढ

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 27, 2022 10:16 AM IST

महाराष्ट्रात सर्वाधिक ६ हजार ४९३ कोरोनाबाधित आढळले. तर पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

India Corona Update
India Corona Update (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

देशातील कोरोनाबाधितांची (Corona Update) संख्या वाढत चालली असून गेल्या २४ तासात तब्बल ४५ टक्के रुग्णसंख्या वाढली आहे. काल दिवसभरात भारतात १७ हजार ७३ नवे रुग्ण आढळले आहेत. आदल्या दिवशीच्या तुलनेत रुग्णसंख्या वाढीचं प्रमाण हे ४५.५ टक्के इतकं आहे. कोरोनाविरोधात लसीकरण मोहिमसुद्धा देशात वेगाने सुरू आहे. आतापर्यंत १ अब्ज ९७ कोटी ११ लाख ९१ हजार ३२९ लशींचे डोस देण्यात आले आहेत. गेल्या २४ तासात २ लाख ४९ हजार ६४६ जणांना लस देण्यात आली. (India Corona update)

कोरोनाची रुग्णसंख्या आढळण्याचा सध्याचा दर हा प्रतिदिन ३.३९ टक्के इतका आहे. देशात चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली असून गेल्या २४ तासात देशात ३ लाख ३ हजार ६०४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत ८६.१० कोटी कोरोना चाचण्या झाल्या आहेत.

देशातील सक्रीय रुग्णांची संख्या ९४ हजार ४२० इतकी आहे. गेल्या २४ तासात १५ हजार २०८ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आतापर्यंत देशात ४ कोटी २७ लाख ८७ हजार ६०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

रविवारी देशात ११ हजार ७३९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर सोमवारी आलेल्या आकडेवारीनुसार त्यात ४५ टक्के वाढ झाल्याचं दिसतं. महाराष्ट्रात सर्वाधिक ६ हजार ४९३ कोरोनाबाधित आढळले. तर पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एका अधिकाऱ्याने शनिवारी आयसीएमआरच्या पोर्टलमध्ये तांत्रिक त्रुटीमुळे ज्या रुग्णांची नोंद केली नव्हती त्यांची नोंद रविवारी करण्यात आली. महाराष्ट्रात सक्रीय रुग्णांची संख्या २४ हजार ६०८ इतकी आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण आकडेवारी ७७ लाख ९० हजार १५३ इतकी झाली आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग