मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Umesh Pal Case : जन्मठेपेची शिक्षा ऐकून अतिक अहमद झाला बेशूद्ध; समर्थकांची वकिलांना धक्काबुक्की
Gangster Atique Ahmed Life Imprisonment In Umesh Pal Murder Case
Gangster Atique Ahmed Life Imprisonment In Umesh Pal Murder Case (HT)

Umesh Pal Case : जन्मठेपेची शिक्षा ऐकून अतिक अहमद झाला बेशूद्ध; समर्थकांची वकिलांना धक्काबुक्की

28 March 2023, 16:38 ISTAtik Sikandar Shaikh

Gangster Atique Ahmed UP : उमेश पाल हत्या प्रकरणात कुख्यात गँगस्टर अतिक अहमदला कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Gangster Atique Ahmed Life Imprisonment In Umesh Pal Murder Case : उत्तर प्रदेशातील उमेश पाल हत्या प्रकरणात विशेष कोर्टानं कुख्यात गँगस्टर अतिक अहमदला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिकसह त्याचा निकटवर्तीय शौकत हनीफ आणि दिनेश पासी यांच्यासह आणखी एका आरोपीला कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर कोर्टानं अतिकचा भाऊ अशरफला निर्दोष ठरवलं आहे. त्यामुळं आता उमेश पाल हत्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. ज्यावेळी न्यायाधीशांनी आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली त्यावेळी आरोपी अतिक अहमद कोर्टातच बेशूद्ध पडला. त्यानंतर त्याला कोर्टाच्या बाहेर नेण्यात आलं. त्यावेळी त्याच्या समर्थकांनी कोर्ट परिसरातच धूडगूस घालत विरोधी वकिलांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काय आहे नेमकं प्रकरण?

बहुजन समाज पक्षाचे आमदार राजू पाल यांची उत्तर प्रदेशात हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात उमेश पाल हे एकमेव साक्षीदार असल्यामुळं कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याच्या साथीदारांकडून त्यांना तोंड बंद ठेवण्यासाठी धमक्या दिल्या जात होत्या. परंतु त्यानंतर काही आरोपींनी उमेश पाल यांचं अपहरण करत त्यांची हत्या केली. या प्रकरणात थेट अतिक अहमदचा आणि त्याच्या साथीदारांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. यापूर्वी अतिकवर दरोडा, खून, लूट अशा गंभीर प्रकरणांमध्ये शंभराहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले होते. अतिक हा एका प्रकरणात गुजरातमधील साबरमती कारागृहात शिक्षा भोगत होता. त्यानंतर प्रयागराज कोर्टानं आदेश दिल्यानंतर त्याला काल संध्याकाळी गुजरातहून उत्तर प्रदेशात आणण्यात आलं. त्यानंतर कोर्टानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

कोण आहे अतिक अहमद?

अतिक अहमद हा उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीचा माजी खासदार आहे. तो तीन वेळा विधानसभेचा आमदारही राहिलेला आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्यानं प्रयागराज आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले होते. १९७९ साली त्याच्यावर पहिल्यांदा हत्या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला होता. याशिवाय १९८९ मध्ये विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी केली म्हणून महिलेची हत्या केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. १९९६ मध्ये प्रयागराज जिल्ह्यात एका नामवंत व्यापाऱ्याच्या हत्येचा कट आखल्याप्रकरणी अतिकवर एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्याच्यावर शंभराहून गंभीर गुन्ह्याखाली केसेस असतानाच त्याच्या इशाऱ्यावर उमेश पालचं अपहरण आणि हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणात कोर्टानं अतिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.