Court News: मद्रास उच्च न्यायालयाने बलात्काराच्या आरोपीला मुक्त करताना म्हटले की, प्रेमात आणि युद्धात कोणताही नियम नसतो. या प्रकरणात सुटका झालेला आरोपी २०१४ मधील एका बलात्कार प्रकरणात अटकेत होता. या प्रकरणातील पीडितेने एका मुलाला जन्म दिला होता. आरोपीने आपल्या शिक्षेच्या विरोधात २०१७ मध्ये न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. न्यायालयाने या मुलाच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर हे प्रकरण मध्यस्थीकडे पाठवले होते. या दरम्यान तक्रारदार महिलेने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. जस्टिस एन शेषशायी यांनी निकाल देताना म्हटले की, हे प्रकरण खुपच अनोखे आहे. सिंगल बेंच न्यायाधीशांनी म्हटले की, दोघांमध्ये मध्यस्थीचा परीनाम असा झाला की, त्यांना दुसरा मुलगा झाला.
जेव्हा बलात्काराचा आरोपी व तक्रारदार महिलेला दूसरा मुलगा झाला तेव्हा कोर्टाने राज्य सरकारला याची पुष्टी करण्यास सांगितले होते. त्यानंतर राज्य सरकारने याची पुष्टी करत दुसऱ्या मुलाचे बर्थ सर्टिफिकेटही रिकॉर्डवर आणले होते. कोर्टाने म्हटले की, दोघे प्रौढ आहेत. देशाचे संविधान कोणतेही नैतिक निवेदन देत नाही. संविधान नागरिकांना जीवन जगण्यासाठी आयुष्य देते. त्यातच जर दोषी आणि तक्रारकर्ती महिला आपल्या मर्जीने जीवनाचा मार्ग निवडत असतील तर कायद्याला याहून मोठे काहीच नाही. कोर्टाने म्हटले की, अभियोजन पक्ष हे सिद्ध करू शकलेला नाही की, हा गुन्हा होता.
कोर्टने निरीक्षण केले की, या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग झाला आहे. दरम्यान कोर्टाने म्हटले की, मात्र ही भूतकाळातील कथा आहे. न्यायालय या मुद्द्यावर पुन्हा विचार करू शकत नाही. न्यायलयाने म्हटले की, तक्रारदार महिलेने खुलासा केला होता की, तिचे आरोपीसोबत गेल्या अनेक वर्षापासून शारीरिक संबंध होते. मात्र तिने कधी आक्षेप घेतला नाही. तिने आरोपीविरोधात तोपर्यंत तक्रार केली नाही, जोपर्यंत तिला मूल झाले नाही. तक्रारदार महिलाही संज्ञान होती व तिला माहिती होते की ती काय करत हे. दरम्यान, ट्रायल कोर्टाने याकडे दुर्लक्ष केले होते.