मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Imran Khan PTI : इम्रान खान यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी; कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

Imran Khan PTI : इम्रान खान यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी; कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 02, 2022 07:01 AM IST

Pakistan Ex PM Imran Khan Controversial Statement : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात कोर्टानं अटक वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळं आता त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

Arrest Warrant Issued Against Pakistan Ex PM Imran Khan
Arrest Warrant Issued Against Pakistan Ex PM Imran Khan (REUTERS)

Arrest Warrant Issued Against Pakistan Ex PM Imran Khan : पाकिस्तानचं पंतप्रधानपद गेल्यापासून इम्रान खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते विरोधकांवर केलेल्या विखारी टीकेमुळं चर्चेत होते. त्यानंतर आता त्यांच्याविरोधात कोर्टानं अटक वॉरंट जारी केल्यानं ते चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी रॅलीत बोलताना त्यांनी न्यायाधीश जेबा चौधरी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता कोर्टानं स्वत:हून या प्रकरणाची दखल घेत माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळं आता त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

इम्रान खान यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये चार कलमं लावण्यात आली आहे. त्यात धमकावणे, शांतता भंग करण्यासंदर्भात वक्तव्य करणं, सरकारी कर्मचाऱ्याचा अपमान आणि न्यायालयाच्या आदेशाचा अवमान अशा गुन्ह्यांखाली इम्रान खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर इम्रान खान यांनी शपथपत्र सादर केलं. परंतु त्याच्या काही तासांतच कोर्टानं त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलंय. जाहीर सभेत बोलताना इम्रान यांनी पातळी सोडून वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

न्यायाधिशांना धमकावल्याप्रकरणी दुसऱ्यांदा गुन्हा दाखल...

न्यायाधिशांना धमकावल्याप्रकरणी इम्रान खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी त्यांनी इस्लामाबादचे सदर दंडाधिकारी अली जावेद यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्या प्रकरणात त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. परंतु आता पुन्हा एका न्यायाधिशांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं इम्रान खान यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

IPL_Entry_Point