मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Romance Video : धावत्या बुलेटवर किसिंग करत जोडप्याचा जबरदस्त रोमान्स, पाहा व्हिडिओ व्हायरल

Romance Video : धावत्या बुलेटवर किसिंग करत जोडप्याचा जबरदस्त रोमान्स, पाहा व्हिडिओ व्हायरल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 29, 2023 06:32 PM IST

Couples Kissing On Bullet : धावत्या बुलेटवर जोडप्याने रोमान्स केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Couples Kissing On Bullet Viral Video
Couples Kissing On Bullet Viral Video (HT)

Couples Kissing On Bullet Viral Video : महामार्गावर बुलेट किंवा स्पोर्ट्स बाईकवर स्टंटबाजी करून स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या टवाळखोरांनी पुन्हा एकदा महामार्गावर धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. एका जोडप्याने धावत्या बुलेटवर रोमान्स करत किसिंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या रस्त्यावरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर आता महामार्गावर धक्कादायक कृत्य करणाऱ्या जोडप्यावर पोलीस कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी जोडप्याने धावत्या बुलेटवर रोमान्स केल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, लखनौमधील रस्त्यावर एक जोडपं व्हायरल व्हिडिओत बुलेटवर रोमान्स करताना दिसत आहे. बुलेटच्या टाकीवर बसून तरुणी प्रियकराला मिठी मारत आहे. तर आरोपी तरुण एका हाताने बुलेट चालवत असून दुसऱ्या हाताने त्याने तरुणीला घट्ट पकडलेलं आहे. दोघांनीही हेल्मेट घातलेलं नसल्याचंही व्हिडिओतून स्पष्ट दिसत आहे. याशिवाय दोघांच्याही अंगावर तोकडे कपडे आहे. ट्वीटर युजर ममता त्रिपाठी यांनी हा धक्कादायक व्हिडिओ शेयर करत जोडप्यावर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी 'हे कसलं प्रेम आहे, ज्यात लोक जीव धोक्यात घालायलाही तयार आहे', असं म्हटलं आहे.

ट्वीटर युजर ममता यांनी व्हिडिओ शेयर करताना उत्तर प्रदेश पोलिसांनाही टॅग करत जोडप्यावर कायदेशीर कारावाई करण्याची मागणी केली आहे. फक्त पाच सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय, त्याला आतापर्यंत तब्बल २७ हजार लोकांनी पाहिलं आहे. त्यानंतर अनेकांनी बुलेटवर रोमान्स करणाऱ्या जोडप्यावर टीका केली असून काहींना त्यांना प्रेमाखातर पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आता लखनौ पोलिसांनी धावत्या बुलेटवर रोमान्स करणाऱ्या जोडप्यावर कारवाई केल्याचा दावा करण्यात येत आहे.

WhatsApp channel