Viral News : जोडप्याने लग्नपत्रिकेवर असे काही लिहिले की घाबरू लागले लोक; म्हणाले, राहू द्या आम्ही नाही येत लग्नाला
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : जोडप्याने लग्नपत्रिकेवर असे काही लिहिले की घाबरू लागले लोक; म्हणाले, राहू द्या आम्ही नाही येत लग्नाला

Viral News : जोडप्याने लग्नपत्रिकेवर असे काही लिहिले की घाबरू लागले लोक; म्हणाले, राहू द्या आम्ही नाही येत लग्नाला

Published Feb 10, 2025 03:59 PM IST

ViralWeddingCard : इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका वेडिंग कार्डने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या कार्डनुसार ९ फेब्रुवारीला जयपूरमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे. पण यात कुटुंबीयांनी आपल्या मृत सदस्यांची नावेही लिहिली आहेत, ज्यावर लोकांनी आपापल्या परीने प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हायरल वेडींग कार्ड
व्हायरल वेडींग कार्ड

Viral Wedding Card : इंटरनेटवर रोज काहीना काही व्हायरल होत असते. लग्न सराईच्या हंगामात व्हायरल कंटेंटचा जणू पूरच येतो. पण लग्नाचे कार्डही  महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांना संस्मरणीय बनवण्यासाठी लोक विविध मार्गंचा अवलंब करतात. हे कार्ड इतर लोकांपेक्षा चांगले करण्यासाठी लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर हजारो रुपये खर्च केले जातात.

नुकतेच एका मुस्लीम कुटुंबाच्या लग्नाचे कार्ड इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या कार्डमध्ये घरच्यांनी असं काही लिहिलं आहे की इंटरनेटवरील वाचक ते पाहून घाबरत आहेत. इंटरनेटवर लोकांनी आपापल्या पद्धतीने त्यावर कमेंट करायला सुरुवात केली आहे.

फैक अतीक किडवई यांच्या नावाने एका फेसबुक पेजवर लग्नाचे कार्ड पोस्ट करण्यात आले आहे. या कार्डनुसार ९ फेब्रुवारीला जयपूरमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे. कार्डमध्ये कुटुंबीयांनी मुंतझिर म्हणजेच दर्शनभिलाशी म्हणून आपल्या कुटुंबातील मृत सदस्यांची नावेही लिहिली होती. याशिवाय कुटुंबातील इतर सदस्यांची नावेही लिहिली आहेत. उरलेल्या दोन ठिकाणी ओळख लपवण्यासाठी वधू-वरांचे नाव लग्नाचे लोकेशन पांढऱ्या रंगात एडिट करण्यात आले आहे. कार्ड पोस्ट करताना याच्या कॅप्शनमध्ये त्याने असेही लिहिले आहे की, मेलेले लोक येथे वाट पाहत आहेत, त्यामुळे भाऊ जाऊ द्या, मी काही येथे जाणार नाही.

व्हायरल होत असलेली लग्नपत्रिका
व्हायरल होत असलेली लग्नपत्रिका

फेसबुकवर पोस्ट केलेल्या या पोस्टवर लोकांनी आपापल्या परीने प्रतिक्रिया दिल्या आहेत. राजस्थानमधील जोधपूर, जयपूर सारख्या भागात असे लिखाण सामान्य आहे, असे अनेकांनी लिहिले आहे. त्यात वेगळं काहीच नाही. एका युजरने लिहिले की, नुकतेच मलाही असेच कार्ड मिळाले आहे. या कार्डमध्ये कुटुंबीयांनी आपल्या चार मृत सदस्यांची नावेही लिहिली होती.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर