लखनऊमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील चिनहट येथील रेड लाइन गेस्ट हाऊसमध्ये एक प्रेमीयुगुल उतरले होते. हे जोडपे तीन दिवस तेथे थांबले होते. ३ जून रोजी ते खोलीत उतरले होते. दोन दिवसानंतर खोलीतून दुर्गंध यायला सुरूवात झाली. त्यानंतर स्टाफने दरवाजा तोडला. आत बेडवरील दृष्य पाहून सर्वांना धक्का बसला. बाराबंकी येथील त्रिभुवन सिंह याने ३ जून रोजी आपली प्रेयसी कामिनी रावत (२३) हिची गळा दाबून हत्या केला व फरार झाला. खोलीतून वास येत असल्याने गेस्ट हाउसच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दुपारी दरवाजा तोडून आत पाहिले असता कामिनीचा मृतदेह बेडवर पडला होता. मृतदेह फुगला होता.
त्रिभुवन या हॉटेलमध्ये ३० मेपासून थांबला होता. कामिनी तीन जून रोजी त्याच खोलीत आली होती. पोलीस तपासात समोर आले की, त्रिभुवनचा मृतदेह चार जून रोजी बाराबंकी येथे रेल्वे स्टेशनजवळ रुळावर पडला होता. रेल्वेच्या धडकेत त्याचा मृतदेह झाल्याचे समजून नातेवाईकांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले होते. आता कामिनीचा मृतदेह आढळल्याने पोलिसांनी दावा केला की, त्रिभुवनने तिची हत्या केली व बाराबंकीमध्ये ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. चिनहट आणि बाराबंकी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिसांनी सांगितले की, त्रिभुवन आणि कामिनी बाराबंकी येथील औरंगाबादचे रहिवासी होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. गेस्ट हाउसच्या नोंदीनुसार त्रिभुवन ३० मे रोजी आला होता. त्याने म्हटले की, ३ जून रोजी तिची मैत्रिण येथील व त्याच्यासोबत थांबले. दोघांनी रजिस्टरमध्ये आपला खरा पत्ता दिला होता. त्यामुळे त्यांची ओळख पटू शकली. कामिनीच्या वडिलांनी सांगितले की, ती ३ जूनपासून बेपत्ता होती. ती बेपत्ता असल्याची तक्रार जहांगीराबाद ठाण्यात दिली होती. नातेवाईकांनी सांगितले की, त्रिभुवन व कामिनी एकाच परिसरात रहात होते.
पोलिसांनी गेस्ट हाउसच्या संचालकाशी चौकशी केली. तीन जूनपासून खोलीला कुलूप होते तर स्टाफने चौकशी का केली नाही. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, त्रिभुवन तीन जून रोजी कोणालाही न सांगता निघून गेला होता. कर्मचाऱ्यांना जेव्हा समजले की त्रिभुवनचा मृतदेह रेल्वे रुळावर पडला आहे, त्यांनाही धक्का बसला.
चिनहट पोलिसांनी बाराबंकी पोलिसांशी संपर्क केल्यानंतर समजले की, त्रिभुवनचा मृतदेह चार जून रोजी आढळला. रेल्वे पोलिसांनी त्रिभुवनच्या नातेवाईकांशी संपर्क केल्यानंतर त्यांनी सांगितले की, त्रिभुवन तीन जून रोजी लखनऊ मध्ये काही काम आहे म्हणून घरातून निघाला होता. पोलिसांनी सांगितले की, अजूनपर्यंत हे स्पष्ट झाले नाही की, त्याला ट्रेनची धडक बसली की, त्याने आत्महत्या केली. मात्र पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे की, त्रिभुवनने कामिनीची हत्या करून आत्महत्या केली.
त्रिभुवन आणि कामिनी यांच्यात विवाह करण्यावरून वाद निर्माण झाला होता. यावरून दोघांचे बोलणेही बंद झाले होते. यामुळे त्रिभुवनला त्रास होत होता. ३ जून रोजी त्याने तिला खोलीत बोलावले होते, त्या दिवशीही दोघांमध्ये यावरून वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात त्रिभुवनने तिची हत्या केली.
संबंधित बातम्या