Suhaagraat Vlog vrial video : सोशल मीडियाच्या या जमान्यात रील्स आणि व्हिडिओ ब्लॉग बनवण्याचा ट्रेंड वाढला आहे. व्हायरल होण्यासाठी कुणीही काहीही करत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक नवविवाहित जोडपे त्यांच्या लग्नाच्या रात्रीचा व्लॉग बनवताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, वर नववधूला तिच्या 'मधूचंद्राच्या' अनुभवाबद्दल विचारताना दिसत आहे, ज्यावर ती उत्तर देते की ते अद्याप काही सांगता येणार नाही. यानंतर दोघेही त्यांच्या बेडरूमची सजावट नेटकऱ्यांना दाखवू लागतात आणि त्यांच्या लग्नाच्या रात्रीच्या तयारीबद्दल सांगू माहिती देऊ लागतात.
व्हिडिओमध्ये असलेले कापल त्यांच्या बेडरूममध्ये आहेत. त्यांचे नुकतेच लग्न झालेले असून दोघेही हनिमूनच्या तयारीत आहेत. व्हिडिओत त्यांच्या खोलीतील बेड हा फुलांनी सजवलेला दिसत आहे. तर मुलाच्या हातात फोन असून तो त्याच्या हनिमूनच्या तयारीविषयीची माहिती देतांना दिसत आहे.
व्हिडिओत त्याच्या सोबत त्याची पत्नी देखील आहे. दोघेही व्हिडिओत सांगतात की ही त्याच्या लग्नाची पहिली रात्र आहे. मुलगा त्याच्या पत्नीचीही ओळख करून देतो. आणि मग तो त्याच्या मधूचंद्रासाठी सजवलेला बिछाना दाखवतो. यानंतर दोघेही एकमेकांना किस करतात आणि खोलीतील सजावट दाखवू लागतात.
दोघांनी केलेला हा व्लॉग इंटरनेट आणि सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्या या व्हिडिओवर भन्नाट कमेन्ट दिल्या आहेत. एक्स युजर सुनंदा रॉयने तिच्या एक्स हँडलवर ५ जुलै रोजी शेअर केलेली ही पोस्ट आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिली आहे. एका युजरने तर ‘भाऊ, अपडेट देत राहा’ असे लिहिले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये "सुहागरात व्लॉग" असे लिहिले आहे.
या पोस्टवर अनेक सोशल मीडिया यूजर्सनी कमेंट बॉक्समध्ये टीका केली आहे. एकाने लिहिले, "हे अगदी स्पष्ट आहे की ते त्यांची १००० वी रात्र साजरी करत आहेत. लोकप्रियतेसाठी लोक कोणत्याही मर्यादेपर्यंत जाऊ शकतात." दुसऱ्या यूजरने लिहिले, "लोक काही पैशासाठी त्यांचे वैयक्तिक क्षण देखील शेअर करण्यास कसे तयार असू शकतात? पैशापेक्षा प्रतिष्ठा आणि चारित्र्य मोठे असते."
एका यूजरने लिहिले की, "अरे सुनंदा जी, इज्जत तेल घेण्यासाठी गेली आहे. काहीही करा आणि प्रसिद्ध व्हा. आजकाल हा ट्रेंड सुरू आहे." एकाने विचारले, “याच्या पुढचा व्हिडिओ कुठे आहे?
संबंधित बातम्या