Couple Viral Video: नागपूर येथील कुख्यात गुंड्याचा प्रेयसीसोबत दुचाकीवर अश्लील चाळे करताना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर नागपूर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. या घटनेला काही दिवस उलटले नाही तोच दुचाकीवर अश्लील चाळे करणारा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत असून संबंधित जोडप्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वाहतूक नियमांना पायदळी तुडवत दोन तरुण आणि एक तरुणी एकाच बाईकवरून प्रवास करताना दिसत आहे. या तिघांनीही हेल्मेट घातलेले नाही. बाईक चालवणाऱ्या तरुणाच्या पाठीमागे बसलेले जोडप असून धावत्या बाईकवर एकमेकांचे चुंबन घेत आहेत. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘लोकांना रील बनवण्याचे वेड लागले आहे. अशा कृत्यांमुळे स्वत:ही मरू आणि दुसऱ्यांनाही मारू. याशिवाय, निर्लज्जपणाचीही हद्द ओलांडणार!’
ट्विटरसह हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर देखील शेअर करण्यात आला आहे. या जोडप्याने याआधीही अशाप्रकारे व्हिडिओ बनवले आहेत. रील बनवण्यासाठी एखादा व्यक्ती कुठल्या थराला जाईल, हे सांगणे कठीण आहे. बहुतेक जण लाइक्स आणि कमेंट मिळवण्यासाठी असे स्टंट करतात,असेही बोलले जात आहेत.
सार्वजनिक उद्यानात रोमान्स करतानाचा एका जोडप्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ अमेरिकेतील न्यूयॉर्कधील असल्याचे बोलले जात आहे. उद्यानात बसलेल्या मुलांनी जोडप्याचा अश्लील कृत्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. @girlsorwomen युजरने टिकटॉकवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. याप्रकरणी संबंधित जोडप्याविरोधात कारवाई केली जाते.