Couple Viral Video: सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टी करू नये, ज्यामुळे इतरांना त्रास होईल किंवा लज्जा वाटेल, असा सल्ला वारंवार दिला जातो. मात्र, काही लोक ते मान्य करायला तयार नाहीत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात एका जोडप्याने जत्रेतच अश्लील कृत्य केले. महत्त्वाचे म्हणजे, तिथे उपस्थित असलेले लोक त्यांचा व्हिडिओ बनवत असूनही हे जोडपे थांबले नाही. या जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या जोडप्याचा व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या मेरठ येथील असल्याचे सांगितले जात आहे, जिथे देवी नवचंडीच्या नावाने जत्रेचे आयोजन केले जाते. या जत्रेत पोहोचलेल्या संबंधित जोडप्याने सर्वांसमोर अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली.मोठ्या संख्येने लोक तेथे उभे राहून जोडप्याचे अश्लील कृत्य पाहत आहेत. मात्र, तरीही जोडप्यांवर कोणताही परिणाम होत नाही, असे व्हिडिओत दिसत आहे. तिथे उपस्थित लोकांनी त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे, जो आता व्हायरल होत आहे. असे सांगितले जात आहे की, जोडप्याल त्यांच्या मित्रांनी चॅलेंज दिले होते, जे पूर्ण करण्यासाठी हे जोडपे जत्रेत असे कृत्य करताना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले.
मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 'देवी नवचंडीच्या नावाखाली या जत्रेत काय चालले आहे, अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे', असा संताप एका युजरने व्यक्त केला आहे. दुसऱ्याने लिहिले आहे की, 'आजकाल सगळीकडे हेच चालले आहे. हे सर्व सार्वजनिक ठिकाणी असा प्रकार घडू नये', यासाठी सरकारने कायदा करावा. आणखी जण म्हणतोय, 'अशा लोकांवर कोणताही प्रभाव पडत नाही. सरकारने मार्गदर्शक तत्त्वे बनवावीत आणि अशा लोकांविरोधात कारवाई करावी'. एका युजरने असे म्हटले आहे की,'धार्मिक स्थळांचे पबमध्ये रूपांतर केले जात आहे आणि दर्शनाच्या नावाखाली सुट्टी साजरी केली जात आहे. जत्रेत अश्लील कृत्ये होत आहेत, समाज कुठे चालला आहे?'
याआधी नागपूर येथील एका जोडप्याचा धावत्या कारमध्ये अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली. व्हायरल व्हिडिओतील जोडप्याचे वय २८ वर्षे आहे. तरुण चार्टर्ड अकाउंटंट आहे. तर, महिला इंजिनिअर आहे. या प्रकरणी पोलिसांनी बीएनएस आणि मुंबई पोलीस कायदा आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. नागपूरच्या सर्वात वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या शंकर नगर येथील लॉ कॉलेज चौकातील हा व्हिडिओ आहे.
संबंधित बातम्या