Viral News : हे आधार कार्ड नाही तर आहे लग्नाची पत्रिका! विश्वास बसत नसेल तर क्लिक करून नीट पाहा; सोशल मीडियावर व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : हे आधार कार्ड नाही तर आहे लग्नाची पत्रिका! विश्वास बसत नसेल तर क्लिक करून नीट पाहा; सोशल मीडियावर व्हायरल

Viral News : हे आधार कार्ड नाही तर आहे लग्नाची पत्रिका! विश्वास बसत नसेल तर क्लिक करून नीट पाहा; सोशल मीडियावर व्हायरल

Dec 15, 2024 01:52 PM IST

Viral News : एका जोडप्याने आपल्या लग्नाचे कार्ड संस्मरणीय बनवण्यासाठी आधार कार्डप्रमाणे छापले. त्याचा फोटो पोस्ट होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 हे आधार कार्ड नाही तर आहे लग्नाची पत्रिका! विश्वास बसत नसेल तर क्लिक करून नीट पाहा; सोशल मीडियावर व्हायरल
हे आधार कार्ड नाही तर आहे लग्नाची पत्रिका! विश्वास बसत नसेल तर क्लिक करून नीट पाहा; सोशल मीडियावर व्हायरल

Viral News : सध्या लग्नसराईला सुरूवात झाली आहे. लग्नसराई म्हटलं की लग्नाची तयारी, लग्न, विधी, परंपरा या गोष्टी सहज येतात. कोणत्याही लग्नात सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे लग्नाची निमंत्रण पत्रिका. लग्नाच्या दोन महिन्यापूर्वी निमंत्रण पत्रिका छापली जाते. या निमंत्रण पत्रिकेत वधू वराविषयी, त्यांच्या कुटूंबाविषयी आणि लग्नातील सर्व कार्यक्रमाच्या तारखांविषयी सविस्तर माहिती दिली जाते. सध्या अशीच एक लग्न पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आधार कार्ड सारखी दिसणारी ही लग्न पत्रिका सोशल मिडियावर व्हायरल झाली असून ही पत्रिका पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

 काहीतरी वेगळं आणि संस्मरणीय करण्याची इच्छा लोकांमध्ये सुरुवातीपासूनच असते. लग्न समारंभ संस्मरणीय बनवण्यासाठी आजकाल विविध फंडे वापरण्याचा ट्रेंड आला आहे. यात महत्वाचं म्हणले  लग्नाचे कार्ड अनोखे बनवणे. पूर्वी  लग्नपत्रिका धार्मिक फोटो व साध्या पद्धतीने तयार केल्या जात होत्या. पण सोशल मीडियाच्या युगाने सर्व काही बदलून टाकले आहे. नुकतंच एका जोडप्याने आपल्या लग्नाची पत्रिका अशा प्रकारे बनवलं की ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.  जेव्हा लोकांनी त्यांची लग्न पत्रिका पाहिली तेव्हा ती  आधार कार्डसारखी दिसत होती. मात्र, नंतर ते नीट पाहिल्यावर समजलं की, ही खरोखरच लग्न पत्रिका आहे.  

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केलेली ही लग्न पत्रिका एकाद्या आधार कार्ड सारखी  दिसते. याची फॉन्ट स्टाईल,  लेआउट अगदी अधिकृत आधार कार्डसारखेच आहे. त्यामुळे पाहणाऱ्यांना हे कुणाचे तरी आधारकार्ड आहे असेच वाटेल. मात्र, हे कार्ड बारकाईने व  काळजीपूर्वक पाहिल्यानंतरच ही लग्न पत्रिका असल्याचं लक्षात येतं. आधार कार्ड सारखी दिसणारी ही लग्न पत्रिका मध्य प्रदेशातील पिपरिया गावात राहणाऱ्या नवरदेव प्रल्हाद आणि वर्षा यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका  असल्याचे दिसून येते. या कार्डवर नेहमीच्या आधार क्रमांकाऐवजी त्यांच्या लग्नाची तारीख २२ जून २०१७ नमूद करण्यात आली आहे. फोटोच्या जागी वधू-वर दोघांचा एकत्र फोटो आहे. याशिवाय खालच्या बाजूला एक बारकोडही तयार करण्यात आला आहे.

लग्नाचं कार्ड युनिक बनवण्याचा हा पहिलाच प्रयत्न नाही. अशीच एक लग्न पत्रिका काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. ही लग्न पत्रिका  मॅकबुक प्रो लॅपटॉपसारखी दिसत होती. सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या क्रेझमुळे वेडिंग कार्डमधील वेगळेपणाची फॅशन सध्या सुरू झाली आहे. अनेक जोडपी आपल्या लग्नाच्या कार्डमध्ये प्रादेशिक बोली भाषा आणि राजकीय पक्षांचे समर्थन देखील करतांना दिसत आहे. 

सोशल मीडियावर या लग्न पत्रिकेवर नेटकऱ्यांनी विविध  प्रतिक्रिया दिल्या आहेत.  एका युजरने म्हटले की, हे सर्व खूप वेगळे आहे. कोणत्याही शासकीय कागदपत्राचे महत्व जपायला हवे. आणखी एका युजरने लिहिले की, पूर्वी मुलांसाठी आधार कार्ड बनवले जात होते, आता लग्नासाठीही आधार कार्ड बनवले जात असल्याचे दिसत आहे. आणखी एका युजरने लिहिले की, अशा पद्धतीने आधार कार्डचा वापर करणे चुकीचे आहे. तर आणखी एका युजरने लिहिलं की, ही पद्धत खूप जुनी आहे. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर