Viral News: धावत्या कारमध्ये स्टेअरिंगवर बसून कार चालविणाऱ्या प्रियकराशी अश्लील चाळे करणाऱ्या प्रेयसीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संबंधित जोडप्यांविरोधात पोलिसांनी कारवाई केली. या घटना ताजी असताना असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एका धार्मिक स्थळावर प्रेमीयुगुल अश्लील चाळे करताना दिसत आहेत. कोणीतरी त्यांचा गुपचूप व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केला. याप्रकरणी संबंधित जोडप्यांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला प्रेमीयुगुलाचा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील असल्याचे बोलत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण तरुणीसोबत अश्लील कृत्य करत असल्याचे दिसत आहे. हे दोघेही कपल असल्याचे बोलले जात आहे. हा व्हिडिओ महेवागंजजवळील एका पौराणिक धार्मिक स्थळाचा आहे.व्हिडिओमध्ये हे प्रेमी युगल नदीच्या काठावर बांधलेल्या प्लॅटफॉर्मच्या जिन्यावर बसलेले आहेत. कुणीतरी त्यांच्या या कृत्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. आरोपी तरुण ओदाराहा गावातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
अश्लील गाण्यांसह व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे दुखावलेल्या तिन्ही मित्रांनी रविवारी एकत्र विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.या मुलींवर जवळच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही मुलांनी बनावट आयडी तयार करून तीन मुलींचा अश्लील भोजपुरी गाण्यांसह फोटो एडिट करून फेसबुकवर टाकले. आता पोलिस व्हायरल करणाऱ्या मुलांचा शोध घेत आहेत. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी सदर हॉस्पिटल सहरसा येथे पाठवले. मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही मुलींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. याप्रकरणी संबंधित मुलींच्या पालकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी तीन मुलींनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. एका मुलीच्या नावाने बनावट आयडी तयार करून काही मुलांनी अश्लील भोजपुरी गाण्यांसह फोटो एडिट करून फेसबुकवर टाकले. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.