मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Delhi Metro : दिल्ली मेट्रोमध्ये कपलचे घाणेरडे कृत्य; बुटामध्ये कोल्ड ड्रिंक टाकून प्यायले, VIDEO VIRAL

Delhi Metro : दिल्ली मेट्रोमध्ये कपलचे घाणेरडे कृत्य; बुटामध्ये कोल्ड ड्रिंक टाकून प्यायले, VIDEO VIRAL

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 03, 2024 04:57 PM IST

Delhi Metro Viral Video : व्हायरल व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की, एक प्रेमीयुगुल दिल्ली मेट्रोमध्ये बसले आहे. ते पायातील शूज काढून त्यात बाटलीतील कोल्ड ड्रिंक ओतून पिताना दिसत आहे.

Delhi Metro Viral Video
Delhi Metro Viral Video

Delhi Metro Couple Video: दिल्ली मेट्रो नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. यामध्ये प्रेमी युगुल अश्लील कृत्य करताना, स्टंट करताना तसेच प्रवाशांमध्ये वादावादीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. दिल्ली मेट्रोमध्ये रील्स बनवून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. दिल्ली मेट्रोचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामध्ये डान्स, किस करतानाचे व्हिडिओ अधिक प्रमाणात असतात. आता पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोतील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एक पायातील बूट काढून त्यामध्ये कोल्ड ड्रिंक ओतते व ते पिताना दिसतात.

व्हायरल व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की, एक प्रेमी युगुल दिल्ली मेट्रोमध्ये बसले आहे. त्यानंतर तरुण आपल्या पायातील एक शूज काढून हातात घेतो. त्याच्या गर्लफ्रेंडच्या हातात कोल्ड ड्रिंकची बाटली दिसते.

त्यानंतर गर्लफ्रेंड आपल्या बॉयफ्रेंडच्या शूजमध्ये कोल्ड ड्रिंक ओतते. बॉयफ्रेंड त्यामध्ये पाइप (स्ट्रॉ) टाकून ते कोल्ड ड्रिंक पिऊ लागतो. त्यानंतर गर्लफ्रेंडही शूजमधून कोल्ड ड्रिंक पिताना दिसून येते. या कपलचा शूजमधील कोल्ड ड्रिंक पितानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

WhatsApp channel

विभाग